निगडी (प्रतिनिधी) : गंगानगर परिसरात भर दिवसा एका 27 वर्षीय तरुणीचा पाठलाग करुन एका टोळक्याने तिच्या डोळ्यात मिर्ची टाकून तिचे कपडे फाडून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवार दि . 22 रोजी सकाळी 11 ते 12:30 च्या सुमारास घडला आहे .
याप्रकरणी पीडितेच्या मोठ्या बहिणीने पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी चेतन मारूती ( वय 31 रा . औंध गाव ) याला अटक केली असून त्याचे तीन साथीदार अद्याप फरार आहेत .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी यांची 27 वर्षीय बहीण या निगडीतील बेल्हेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन येत असताना रोडच्या कडेला मक्याचे कणीस घेण्यासाठी थांबल्या . यावेळी त्यांना पाठीमागून कोणी तरी इसम हे दुचाकीवरून येवून काढ रे काढ कोयता आज हिच्यावर वारच करू अशी धमकी दिल्याचे ऐकू आले . तशी ती तरूणी पळाली असता आरोपी टोळक्याने तिचा पाठलाग केला . ती घाबरून जवळ्च्या सुलभ शौचालयात गेली.
मात्र आरोपी तीथे आले व त्यांनी तिच्या अंगावर दारू ओतली व तिला मिर्ची पावडर खाऊ घालत , डोळ्यात मिर्ची पावडर टाकली . तसेच तिच्या हातावर ब्लेडने वार करून तिचे सर्व कपडे फाडले व निघून गेले . यावरून निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मात्र , भरदिवसा एक टोळके तरूणीचा पाठलाग करून तिचा असा विनयभंग करतात ? यामुळे शहरातील महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.