Thursday, September 28, 2023
Homeपुणेवडगाव3 हजाराची लाच घेणारा पोलीस हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक पथकच्या जाळ्यात..

3 हजाराची लाच घेणारा पोलीस हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक पथकच्या जाळ्यात..

वडगाव मावळ : वडगाव मावळ पोलीस ठाण्यातील हवालदाराला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात केली अटक.

नवरा बायकोच्या भांडणाची तक्रार दाखल झाल्यास अदखलपात्र गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी आरोपीकडून 3 हजार रुपयांची लाच स्विकारताना वडगाव मावळ पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार संतोष पांडुरंग माने असे अटक केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव असून, याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 3 फेब्रुवारी रोजी सापळा लावून ताब्यात घेतले.

पत्नी व पती यांच्या भांडणाची तक्रार वडगाव मावळ पोलीस ठाण्यात आली होती . पत्नीच्या तक्रारीवरून पतीवर अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला होता . याप्रकरणी कारवाई टाळण्यासाठी माने यांनी सदर आरोपीकडे 10 हजार रुपयांची मागणी केली . तडजोड अंती 3 हजार रुपयांची लाच स्विकारताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगे हात पकडले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उप अधिक्षक श्रीमती शितल घोगरे , पोलीस निरीक्षक संदिप वऱ्हाडे , पोलीस नाईक किरण चिमटे , पोलीस शिपाई रियाज शेख , चालक पोलीस शिपाई माळी , दीपक दिवेकर यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे.

- Advertisment -