कार्ला (प्रतिनिधी): महाराष्ट्रातील जागृत देवस्थान व कोळी, आग्री, सिकेपी, सोनार अशी विविध जाती धर्मीयांची कुलस्वामी असलेल्या कार्ला गडावरील श्री एकविरा आई मंदिर देवस्थान ट्रस्टच्या चार जागांसाठी आज मतदान होऊन निकाल जाहिर झाला. यामध्ये देशमुख परिवारातील दोन पदसिद्ध जागांवर देशमुख निवडून आले तर स्थानिक गावातील भाविक या दोन जागांसाठी तब्बल 21 उमेदवार रिंगणात असल्याने मोठी चुरस निर्माण झाली होती. यामध्ये सागर मोहन देवकर व विकास काशिनाथ पडवळ यांनी बाजी मारली आहे. सागर देवकर यास 330 तर विकास पडवळ ला 309 मते मिळाली. गुरव देशमुख परिवारातील मारुती देशमुख यांना 110 तर महेंद्र देशमुख 22 मते घेत विजयी झाले. देवस्थानच्या तीन जागा यापूर्वी बिनविरोध झाल्या होत्या. त्यामध्ये पुजारी प्रतिनिधी म्हणून संजय गोविलकर, गुरव प्रतिनिधी म्हणून नवनाथ देशमुख व गावचे सरपंच या पदसिद्ध जागेवर अर्चना संदीप देवकर यांचा समावेश आहे.
सविस्तर निकाल खालीलप्रमाणे :
1) राघू त्रिंबक देशमुख व कोंडू बहिरु देशमुख तक्षिमेतील सदस्य पदाचे उमेदवारांना झालेले मतदान – 120 पैकी 115 अ) मारुती रामचंद्र देशमुख :- 104 (विजयी) ब)विजय विठ्ठल देशमुख:- 10 क) अमेय विजय देशमुख :- 00 2) नथू दगडू देशमुख तक्षिमेतील सदस्य पदाचे उमेदवारांना झालेले मतदान 38 पैकी 37 अ) महेंद्र अशोक देशमुख – 22 (विजयी) ब) ऋषिकेश बाळु देशमुख – 00 क) भगवान नथू देशमुख – 14 3) स्थानिक गावातील दोन भाविक सदस्य पदाचे निवडीसाठी उमेदवारांना झालेले मतदान 1253 पैकी 1060 1) सागर मोहन देवकर 330 (विजयी) 2) विकास काशिनाथ पडवळ – 309(विजयी) 3) सोमनाथ रामभाऊ बोत्रे – 145 4) युवराज शंकर पडवळ – 257 5) श्रीमती रेशमा युवराज पडवळ – 25 6) शरद वसंत कुटे – 9 7) संजय भागोजी देवकर – 6 8) मंगेश विठ्ठल देशमुख – 126 9) चंद्रकांत हावजी देवकर – 288 10) निलेश साहदू बोरकर – 8 11) संजय भागुजी देवकर – 3 12) अशोक वसंत कुटे – 196 13) विनोद मोहन देवकर – 3 14) निरंजन प्रदिप बोत्रे – 34 15) मारुती राजाराम देवकर – 79 16) आकाश बबन माने – 0 17) सुनिल हुकाजी गायकवाड – 125 18) मिलींद दत्तात्रेय बोत्रे – 1 19) मनोहर सदाशीव पडवळ – 9 20) मधूकर राघु पडवळ – 2 21) अनिकेत दशरथ देशमुख – 1
या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुंबई विभागाचे धर्मदाय कार्यालयातील एस.एस.पारच यांनी काम पाहिले तर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.