Friday, November 22, 2024
Homeपुणेलोणावळाएस एस सी बोर्ड परीक्षेच्या विध्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी,,, वाचा सविस्तर…

एस एस सी बोर्ड परीक्षेच्या विध्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी,,, वाचा सविस्तर…

मावळ (प्रतिनिधी): राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतली जाणारी दहावीची परीक्षा आज पासून सुरू होत आहे. यावर्षी मावळ तालुक्यातील 13 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होत आहे. ह्या वर्षी 10 वी 2022-2023 च्या बोर्डाच्या परीक्षेसाठी मावळतील एकूण 6743 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.
लोणावळा विभागातील व्ही. पी. एस. हायस्कूल मधील 363 विध्यार्थी असून.संपूर्ण राज्यातून तब्बल 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. यासाठी राज्यातील 533 परीक्षा केंद्र सज्ज ठेवण्यात आली आहेत.

विद्यार्थ्यांना सकाळी साडे दहा वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचणे गरजेचे तर दुपारच्या सत्रात 2:30 वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचणे गरजेचं आहे. हॉल तिकीटवर देखील टाईमटेबल नमूद केलेले आहे.
प्रत्येक केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. तसेच भरारी पथकांची देखील स्थापना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी वेळे आधी परीक्षा केंद्रांवर पोहचने गरजेचे आहे. कारण प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका वाटल्यानंतर परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. या सोबतच परीक्षा केंद्रावरील शंभर मीटर अंतरावर झेरॉक्स सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.
परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची चोरी करणे, प्रश्नपत्रिका मिळविणे, विकणे आणि विकत घेतल्यास किंवा मोबाईल अन्य इलेक्ट्रॉनिक्स माध्यमावर प्रसारित केल्यास परीक्षार्थी विद्यार्थ्याची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात दोषी आढळलेल्या मुलावर फौजदारी कारवाई करून पाच वर्ष प्रतिबंध केला जाणार आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page