if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
मावळ (प्रतिनिधी):महिला दिनाचे औचित्य साधून वडगांव येथील मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील हातभट्टी दारू भट्ट्या उध्वस्त करण्यात आल्या.
मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांच्या स्मारकास अभिषेक करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महिला दिनाचे औचित्य साधून मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा, उपाध्यक्षा, कार्याध्यक्षा, संचालिका आणि सदस्यांनी आज वडगाव शहरातील रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रोड लगत असलेल्या मयुरेश्वर कॉलनी परिसरातील बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारूच्या अड्डयाची तोडफोड करत निषेध व्यक्त केला.
सदरचे बेकायदेशीर असलेले दारू विक्रीचे ठिकाण भर वस्तीतील आठवडे बाजार आणि रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रोड लगत असल्याने या भागातील रहिवाशांना आणि या रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांना त्रास होत असून या भागातील रस्त्यावर लहान मुली, तरुण मुली व महिला प्रचंड मानसिक तणावात आहेत. या भागात दारू पिणाऱ्या व्यक्तींमुळे महिला वर्गाला छेडछाडीच्या घृणास्पद प्रकाराला सामोरे जावे लागत असल्याने या नाहक त्रासाचा सामना महिला भगिनींना करावा लागतो.
यासंदर्भात मोरया प्रतिष्ठानने वेळोवेळी आंदोलने केली पोलीस स्टेशनला निवेदने दिली. स्थानिक पोलीस प्रशासनाकडून तात्पुरती कारवाई झाल्यानंतरही हा व्यवसाय लगेचच दुसऱ्या दिवशी राजरोसपणे चालू होत असतो. आज अखेर महिला दिनी मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका पुनम जाधव, चेतना ढोरे, कविता नखाते, प्रतीक्षा गट, जयश्री जेरटागी, मीनाक्षी ढोरे, सुषमा जाजू, शितल ढोरे, सोनाली मोरे, विजया माळी, अमृता कांबळे आदींसह प्रतिष्ठानच्या सुमारे ऐंशी ते नव्वद संचालिका आणि सदस्या मोठ्या संख्येने सहभागी होत हा दारू अड्डा उध्वस्त करून समक्ष आढळलेल्या मालाची होळी करण्यात आली.
हा बेकायदेशीर सुरू असलेला दारू व्यवसाय या भागातून कायमचा हलवावा किंवा कायमस्वरूपी बंद करावा यासाठी मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.