Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडशिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या नियुक्त्या जाहीर !

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या नियुक्त्या जाहीर !

कर्जत ता.वैद्यकीय सहाय्यक सौ.मनिषा दळवी तर कर्जत शहर कक्ष प्रमुख पदी उदय शिंदे यांची नियुक्ती..

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मा. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांचे सूचनेनुसार ” वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या ” समन्वयक या महत्वांच्या पदासाठी सौ. मनीषा दळवी यांची कर्जत तालुका वैद्यकीय सहाय्यक शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा समन्वयक डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन म्हणून तर उदय अनंता शिंदे यांची कर्जत शहर कक्ष प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा समन्वयक डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन पदी , कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या विनंतीनुसार नुकतीच मा. रामहरी भीमराव राऊत – कक्ष प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष , महाराष्ट्र राज्य व मा. ज्ञानेश्वर धुळगंडे – सह कक्ष प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष , महाराष्ट्र राज्य यांनी नियुक्ती केली आहे.

कर्जत तालुक्यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गोरगरीब – गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकांच्या रुग्णांना धर्मदाय रुग्णालयात राखीव खाटा उपलब्ध करून देणे , निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांना रुग्णालयात पूर्णतः मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भातील मदत तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया मोफत करणे संदर्भात योग्य मार्गदर्शनाखाली सदैव तत्पर रहावे व गंभीर महागड्या शस्त्रक्रिया करावयाच्या असलेल्या गोरगरीब गरजू रुग्णांना भरीव प्रमाणात अर्थ सहाय्य व्हावे , याकरिता पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी , मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी , श्री सिद्धिविनायक ट्रस्ट , टाटा ट्रस्ट , यांसारख्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी थेट शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कोपरी , ठाणे येथील मुख्य कार्यालयास संपर्क साधून गरीब – गरजू नागरिकांना सहकार्य करण्याची महत्वाची जबाबदारी सोपवली आहे.

उदय अनंता शिंदे हे कर्जत न.प.हद्दीत मुद्रे (खु ) प्रभागात रहात असून शिवसेनेत व सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात . त्याचप्रमाणे सौ.मनिषा दळवी या देखील राजकारणात ३० वर्षांपासून असून त्यांनी देखील अनेक पदे पक्षात व राजकीय स्थानिक स्वराज्य संस्थेत भूषविली असून त्यांचा ग्रामीण भागात अनेकांशी दांडगा संपर्क असल्याने या दोन्ही नियुक्तीमुळे गोर गरीब नागरिकांना खूपच सहकार्य लाभणार आहे.

सौ. मनीषा दळवी यांची कर्जत तालुका वैद्यकीय सहाय्यक शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा समन्वयक डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन तर उदय अनंता शिंदे यांची कर्जत शहर कक्ष प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा समन्वयक डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन या महत्त्वाच्या कार्यपदी नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
- Advertisment -

You cannot copy content of this page