Saturday, October 19, 2024
Homeपुणेलोणावळावाय सी क्लासेसचा गुण गौरव पुरस्कार व गुरु द्रोणाचार्य पुरस्कार वितरण सोहळा...

वाय सी क्लासेसचा गुण गौरव पुरस्कार व गुरु द्रोणाचार्य पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला..

लोणावळा (प्रतिनिधी): वाय सी क्लासेस लोणावळा आयोजित इयत्ता 10 व 12 च्या गुणवंत विध्यार्थ्यांचा गूण गौरव पुरस्कार दि.13 रोजी प्रियदर्शनी संकुल येथे उत्सहात संपन्न झाला.
यामध्ये दहावी बारावीच्या परीक्षेत उत्कृष्ट गूण संपादन केलेल्या प्रत्येक शाळेतील प्रथम तीन विध्यार्थ्यांना हा पुरस्कार प्रदान करत तब्बल 60 विध्यार्थ्यांना गूण गौरव पुरस्कार 2023 चे वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट म्हणजे यावेळी गुणवंत विध्यार्थ्यांसह पालकांनाही गौरविण्यात आले. तसेच प्रतिस्पर्धी असणाऱ्या खाजगी क्लासेस चालवीणाऱ्या पाच क्लासेसच्या गुरुजनांना गुरु द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करून त्यांचाही उत्साह वाढविणारा वाय सी क्लास एकमेव क्लास ठरला आहे . यामध्ये खाजगी क्लासचे राजू काजळे, हरिविजय महादू देशमुख, संतोष तोंडीलकर व शिष्यवृत्ती मध्ये विशेष कामगिरी करणारे उमेश इंगुळकर व श्रीकांत दळवी यांना ही या पुरस्काराने गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या प्रमुखस्थानी मा. नगराध्यक्षा सुरेखा जाधव,मा. उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी,काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव निखिल कवीश्वर,मा. शिक्षण सभापती जितुभाई कल्याणजी,व्ही पी एस विद्यालयाचे शिक्षक विजय रसाळ (सर),शिव सेनेचे सुभाष डेनकर,सामाजिक कार्यकर्ते वसंत कालेकर, सहादू कालेकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
वाय सी क्लास मागील 24 वर्ष शिक्षणा बरोबर विध्यार्थ्यांना चांगले संस्कार देऊन उत्कृष्ठ विध्यार्थी घडवण्यासाठी यशस्वी होत आहे.वाय सी क्लासेस ची 24 वर्षांपासूनची 100% निकालाची परंपरा असून क्लासची विद्यार्थिनी कु.श्रुती पिंपळे हिने 2023 परीक्षेत दहावी मध्ये 95.80% गुण मिळवून मावळात द्वितीय क्रमांकावर येऊन क्लासचे नावलौकिक वाढविले आहे.
वाय सी क्लासेस मध्ये विध्यार्थ्यांना वर्षभर उत्कृष्ठ शिक्षणाबरोबर इनडोअर / ऑऊटडोअर खेळ,आरोग्य विषयक डॉक्टरांच्या मार्गदर्शनासह शिक्षक दिन, गुरु पौर्णिमा, ट्रॅडिशनल डे, गेट टुगेदर, भोंडला व तज्ञांचे मार्गदर्शन यासारखे उपक्रम राबवत आहेत. “आजचा विध्यार्थी ज्ञानवंत व गुणवंत व्हायला हवाच त्याचबरोबर तो चारित्र्यवान व शिलवंत व्हावा, तो लाचारी पेक्षा तेजस्वी ध्येयवादी असावा, संघर्ष करून स्वबळावर यश संपादन करणारा माणूस आम्ही घडवित आहे.असे निवृत्ती दुडे सर यांनी प्रास्ताविकात म्हटले. तसेच लोणावळा शहर हे स्वच्छ लोणावळा आणि सुंदर लोणावळा झाले असून येथे उत्कृष्ठ शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्रासाठी मैदान व इतर कलेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी चळवळ करणे गरजेचे आहे असे मतही दुडे सरांनी व्यक्त केले.तसेच सुरेखा जाधव यांनी वाय सी क्लासेसची कामगिरी उत्तम असल्याचे कौतुकास्पद मत व्यक्त करताना पुढील काळात विविध कला व खेळांसाठी मैदान उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार असे आश्वासित करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
अतिशय नियोजनबद्ध व प्रसन्न करणाऱ्या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन वाय सी क्लासेसचे संचालक निवृत्ती दुडे, प्राध्यापक दिपेश गोणते, स्पोकन इंग्लिश चे शिक्षक मयूर कनगुटकर, प्राध्यापिका सुजाता आंबेकर,प्राध्यापिका अक्षता जाधव व विध्यार्थ्यांनी केले.
यावेळी उपस्थितांचे वाय सी क्लासच्या वतीने पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवृत्ती दुडे सर यांनी केले,सूत्रसंचालन अर्चना शिरसाठ तर आभार प्रदर्शन दिपेश गोणते सर यांनी केले. पालकांना प्रसन्न व चेहऱ्यावर आनंद आणणारा कार्यक्रम हा प्रमुख मान्यवर, पालक व विध्यार्थी यांच्या उपस्थितीत मोठया उत्सहात संपन्न झाला.
- Advertisment -

You cannot copy content of this page