Saturday, October 19, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडखोपोलीत अनुसूचित जातीच्या महिलांना जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गाव गुंडावर 1989 अंतर्गत गुन्हा...

खोपोलीत अनुसूचित जातीच्या महिलांना जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गाव गुंडावर 1989 अंतर्गत गुन्हा दाखल..

खोपोली (प्रतिनिधी) – शहरातील गावगुंड व स्वतःला पत्रकार म्हणून मिरविणारा कृष्णानगर येथील मोहसीन शेख याच्यावर एका अनुसूचित जातीच्या महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी दि.16 जून रोजी खोपोली पोलिस ठाण्यात अनुसूचित जमाती अधिनियम 1989 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खोपोली पोलिस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार शिळफाटा आभाणी रोड येथील सोळंकी कुटुंबीय अंदाजे गेल्या 40/45 वर्षापासुन याठिकाणी राहत आहे. सदरील ठीकाणी गावगुंड मोहसीन शेख याची जागा असून त्याच्या जागेला लागून खोपोली नगरपरिषदेचे सार्वजनिक शौचालय आहे व शौचालयाचा वापर परिसरातील अनेक रहिवासी करत आहेत.मोहसीन शेख याने सार्वजनिक शौचालया समोर मोठा खड्डा केला असून नागरिकांना शौचालयात जाण्या-येण्यास अडचण निर्माण होत होती.
याबाबत सोळंकी कुटुंबा मधील महिला यांनी मोहसीन शेख याला याबाबत विनंतीपूर्वक विचारणा केली असता गावगुंड मोहसीन शेख याने चुकीचा अर्थ काढून महिलेला आभाणी रोड येथील स्थानिक महिलांच्या समोर जातीवाचक शिवीगाळ करून धक्काबुक्की केली असल्याने याबाबत गावगुंड मोहसीन शेख याच्यावर खोपोली पोलिस निरीक्षक शिरीष पवार यांच्या आदेशानुसार अनुसूचित जाती जमाती 1989 अंतर्गत कलम 3 (1) ( r) , (s) , 323 , 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती खोपोली पोलिसांनी दिली आहे.
आपल्यावर गुन्हा दाखल होणार हा मनामध्ये राग ठेऊन गावगुंड मोहसीन शेख याने खोपोली पोलिस ठाण्याच्या आवारात अनेक पोलिस कर्मचारी व cctv कॅमेरा समोर अभाणी रोड येथील तरुण मुनाफ याला धक्काबुक्की करून मारहाण केली असून पोलिस ठाण्यात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याबाबत सुद्धा मोहसीन शेख व अन्य विरोधात खोपोली पोलिस ठाण्यात कलम 160 , 323 , 504 गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आले असल्याचे पोलिस निरीक्षकांनी सांगितले आहे.
पोलिस ठाण्याच्या आवारात गावगुंड मोहसीन शेख याची माहिती काढली असता याआधी ही त्यावर अनुसूचित जाती जमाती अंतर्गत व इतर अनेक गुन्हे दाखल असल्याचे बोलले जात आहे.
या आधीही त्याने खोपोलीतील काही पत्रकारांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केला होता परंतु पत्रकारांकडे भक्कम पुरावे असल्याने त्यांची मुक्तता करण्यात आली आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page