Saturday, October 19, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडशासन आपल्या दारी ,योजना कल्याणकारी…सर्वसामन्यांच्या घरोघरी !

शासन आपल्या दारी ,योजना कल्याणकारी…सर्वसामन्यांच्या घरोघरी !

भिसेगाव / कर्जत ( सुभाष सोनावणे ) शासन आपल्या दारी , योजना कल्याणकारी – सर्वसामान्यांच्या घरोघरी , या योजने अंतर्गत कर्जत तालुक्यातील मौजे देऊळवाडी येथे तहसिल कार्यालय कर्जत यांचे वतीने दि. १६ जून २०२३ रोजी सकाळी १०:०० ते सायं. ०४:०० या वेळेत भैरवनाथ मंदिर देऊळवाडी येथे विविध दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी या शिबिराचा लाभ या पंचक्रोशीतील अनेक नागरिक व महिलांनी याचा लाभ घेवून दाखले घेतले.

सदर शिबिरास मा. श्री. डॉ. शितल रसाळ – तहसिलदार कर्जत, श्रीम. आशा म्हात्रे – नायब तहसिलदार संजय गांधी योजना, श्री. गोवर्धन माने – अव्वल कारकून, इंदिरा गांधी योजना, श्रीम. वैशाली पाटील • मंडळ अधिकारी चिंचवली श्रीम. माधुरी पाटील, तलाठी किरवली, श्री. दत्ता ठोकळ, तलाठी पळसदरी, श्री. प्रवीण साळुंखे, तलाठी चिंचवली, राजू गायकवाड, महसूल सहाय्यक, पुरवठा शाखा, पवन सूर्यवंशी, महसूल सहाय्यक निवडणूक शाखा, सेतू केंद्रातील कर्मचारी, BLO, श्री. गायकवाड, श्री. दाभणे कोतवाल हे उपस्थित होते.

या शासनाच्या महत्वपूर्ण योजेनेचा आयोजित केलेल्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच शालेय दाखले घेण्यासाठी ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
शिबिराअंतर्गत उत्पन्न दाखले (१ वर्षासाठी )- ४५ उत्पन्न दाखले (३ वर्षासाठी) २४ , वय राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र ९ , नवीन रेशनकार्ड -१६ , नवीन आधारकार्ड नोंदणी- २६ , आधारकार्ड अद्यावतीकरण- १४, नवीन मतदार नोंदणी २८ , जातीचे दाखले ५ , आर्थिक दुर्बल प्रमाणपत्र ३ , मतदार नाव कमी करणे ३ , मतदार नाव दुरुस्ती ८ , संजय गांधी निराधार योजना ९ , अशा विविध प्रकारच्या योजनांचा लाभ एकूण १९० लाभार्थ्यांनी घेतला. सदर शिबिरासाठी बहिरी तळई संस्थांचे पदाधिकारी भाऊ बडेकर , किसन बडेकर , बाळाराम बडेकर , शरद बडेकर , दिलीप बडेकर , रमण बडेकर , वासुदेव बडेकर , मा. उपसरपंच संजय बडेकर, ग्रामपंचायत सदस्य विवेक बडेकर , पोलीस पाटील, सूर्याजी कडव सामाजिक कार्यकर्ते, समीर राऊत, अध्यक्ष, कर्जत तालुका अपंग संस्था, ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ व विद्यार्थी तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page