Friday, September 20, 2024
Homeपुणेमावळवाडीवळे येथील इंद्रायणी नदीवरील तात्पुरता पर्यायी मार्ग वाहून गेल्याने, नऊ गावांचा तुटला...

वाडीवळे येथील इंद्रायणी नदीवरील तात्पुरता पर्यायी मार्ग वाहून गेल्याने, नऊ गावांचा तुटला संपर्क..

मावळ (प्रतिनिधी):वाडीवळे येथील नव्या पुलाचे काम सुरु असताना ग्रामस्थ,प्रवासी यांच्याकरिता तात्पुरत्या स्वरुपात बांधलेला बंधारा पुल पहिल्या पावसात वाहून गेला आहे. त्यामुळे या भागातील तब्बल 9 गावांचा संपर्क तुटला आहे.
वाडीवळे गावातील इंद्रायणी नदीवरील पुल हा त्या पलिकडे असणाऱ्या अनेक गावांतील नागरिकांसाठी दळणवळणाचा प्रमुख मार्ग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाच्या दुरुस्तीची मागणी होत होती. अशात यंदा आमदार सुनिल शेळके यांच्या सौजन्याने हा पुल होत आहे. परंतू जून पूर्वी हा पूल पूर्ण होणे अपेक्षित असताना तो अद्याप बांधकाम अवस्थेत आहे.
दुसरीकडे तात्पुरत्या स्वरुपात बांधण्यात आलेला बंधारा देखील वाहून गेल्याने पंचक्रोशितील वाडीवळे,वळक,बुधवडी, सांगिसे, वेल्लेवळी,नेसावे, खांडशी, उंबरवाडी येथील ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, महिला आणि कामगार वर्ग आदी सर्वांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने ताबडतोब या ठिकाणची पाहणी करुन पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page