Thursday, November 21, 2024
Homeपुणेतळेगावतळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन कडून कुंडमळा येथे पर्यटकांच्या सुरक्षे संदर्भातील सूचना फलकाचे...

तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन कडून कुंडमळा येथे पर्यटकांच्या सुरक्षे संदर्भातील सूचना फलकाचे अनावरण…

तळेगाव (प्रतिनिधी):पावसाळी पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर कुंडमळा या ठिकाणी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन मार्फत सूचना फलकांचे अनावरण करण्यात आले आहे.
नुकताच पावसाळा सुरु झाला आहे, मुसळधार पाऊस व मावळातील निसर्ग सौंदर्य अनेक पर्यटकांना आकर्षित करत असते त्यातीलच एक नाव म्हणजे शेलारवाडी नजीक असणारे पर्यटन स्थळ म्हणजेच कुंडमळा.या ठिकाणी पुणे पिंपरी चिंचवड परिसरातील तसेच अनेक भागातून अनेक नागरिक निसर्गाचे सौंदर्य पाहण्यासाठी येत असतात परंतु कुंडमळा हे ठिकाण अतिशय धोकादायक असून त्या ठिकाणी नवीन आलेल्या पर्यटकांना पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना ताज्या आहेत.
आज दिनांक 1 जुलै 2023 रोजी सायंकाळी साडे सहा वाजता तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या वतीने कुंडमळा येथे इंद्रायणी नदीपात्रातून उतरून कोणीही फोटो काढू नये ,सेल्फी काढू नये, तसेच हे ठिकाण धोकादायक असून याठिकाणी अनेक व्यक्तींचा बुडून मृत्यू देखील झालेला आहे अशा आशयाचे बोर्ड लावण्यात आले आहे.
त्यावेळेस तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांच्या समवेत उपनिरीक्षक मारुती मदेवाड ,पोलीस नाईक प्रशांत वाबळे, पोलीस नाईक किसन कोळप , पोलीस कॉन्स्टेबल बाबाराजे मुंडे उपस्थित होते.
त्यावेळेस उपस्थित पर्यटकांना पोलिसांमार्फत सदर ठिकाणी इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये वाढ झाली आहे तसेच नागरिकांना होणारा धोका याबाबत देखील मार्गदर्शन करून सूचनांचे पालन करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page