Thursday, September 19, 2024
Homeपुणेलोणावळास्मार्ट व्हिलेज वाकसई, रस्ता कमी खड्डे जास्त, ग्रामपंचायतचे मात्र दुर्लक्ष…

स्मार्ट व्हिलेज वाकसई, रस्ता कमी खड्डे जास्त, ग्रामपंचायतचे मात्र दुर्लक्ष…

लोणावळा (प्रतिनिधी): मावळ तालुक्यातील स्मार्ट व्हिलेज पुरस्कृत वाकसई गावातील रस्त्यावर रस्ता कमी खड्डे जास्त असे दृष्य पाहायला मिळत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना खड्ड्यातून मार्ग काढत कसरत करत प्रवास करावा लागतो.
अनेक वर्षांपासून वाकसई फाटा येथील रस्त्याचे पक्के डांबरीकरण व काँक्रिटीकरण होत नसल्याने या ठिकाणी बारा महिने खड्डे असतात आणि या खड्ड्यांमध्ये दर वर्षी पाणी साचून मोठे डबके तयार होत असते त्यामुळे चार चाकी व दुचाकी वाहनांना त्रास तर होतोच. परंतु त्याही अधिक पाई चालणाऱ्या स्थानिकांना तसेच विध्यार्थ्यांना मात्र रस्त्याने येता जाता अंगावर चिखलाचे पाणी उडते का अशी भीती बाळगत प्रवास करावा लागत आहे.
वाकसई ग्रामपंचायतचा मात्र याकडे काना डोळा होत असून स्मार्ट व्हिलेज फक्त नावापुरतेच का? असा प्रश्न स्थानिकांमध्ये निर्माण झाला आहे. तसेच स्मार्ट व्हिलेज घोषित केल्यापासून या गावात पिण्याच्या पाण्याचा अभाव आहे.येथील वाकसई, देवघर, करंडोली, जेवरेवाडी या चारही गावांना पिण्याच्या पाण्यासाठी चार ते सहा दिवस वाट पहावी लागते.वाकसई स्मशानभूमीत लाईट नसल्याने रात्रीच्या वेळी अंत्यक्रिया करताना मोबाईल टॉर्चचा वापर करावा लागत असून ही तर खूप मोठी शोकांतिका आहे.
त्यामुळे वाकसई फाटा ते जयभिम नगर पर्यंतचा रस्ता पक्का करावा, तसेच जीवनास आवश्यक असणारे पाणी किमान दोन तीन दिवसांत सोडण्यात यावे आणि स्मशानभूमीत लाईट बसविणे या मूलभूत गरजा वाकसई ग्रामपंचायतीने नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली जात आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page