Wednesday, July 2, 2025
Homeपुणेलोणावळावाहतूक कोंडी सोडविण्यासाठी लोणावळ्यात पोलीस स्वयंसेवक दलाची स्थापना…

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी लोणावळ्यात पोलीस स्वयंसेवक दलाची स्थापना…

लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळा शहर व परिसरात शनिवार रविवार व सुट्टीच्या दिवशी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी लोणावळा पोलिसांकडून पोलीस स्वयंसेवक दलाची स्थापना करण्यात येत आहे.
सध्या पावसाळी सीजन असल्यामुळे लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी वाढत असल्याने वाहतूक कोंडी मोठया प्रमाणात होत आहे.त्यातच शनिवार रविवारी सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची गर्दी वाढून या दिवशी नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामाना करावा लागतो. या वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी लोणावळा पोलिसांनी पोलीस स्वयंसेवक दलाची स्थापना केली असून त्यासाठी एक ऑनलाईन अर्ज तयार करण्यात आला आहे.
या पोलीस स्वयंसेवक दलात एनएसएस चे सदस्य, कॉलेजचे विध्यार्थी, ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य, स्वयंसेवी संस्था आणि इतर नागरिक यांनी स्वइच्छेने सदर अर्ज भरावा. आणि या दलात सहभागी होऊन पोलीस प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी केली आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page