Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडशिवसेना नेते संतोषशेठ भोईर यांच्या वाढदिवशी " उत्तर रायगड जिल्हा प्रमुख पदी...

शिवसेना नेते संतोषशेठ भोईर यांच्या वाढदिवशी ” उत्तर रायगड जिल्हा प्रमुख पदी ” निवड करून दिली अनोखी भेट !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत खालापूर मतदार संघातील शिवसेनेचे नेते संतोषशेठ भोईर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात कर्जतमध्ये साजरा करण्यात आला . यावेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा रॉयल गार्डन सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
या सोहळ्यास मावळचे खासदार आप्पासाहेब बारणे ,पक्ष प्रतोद तथा महाड चे आमदार भरतशेठ गोगावले , कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे , उपजिल्हा प्रमुख भाई गायकर ,संघटक शिवराम बदे , मा. उपसभापती मनोहर दादा थोरवे , संघटक विजय पाटील , पंकज पाटील , कर्जत ता. प्रमुख संभाजी जगताप , खालापूर प्रमुख संदेश पाटील , मा. सभापती अमर मिसाळ , संदीप शेठ भोईर , शरद ठाणगे, दिलीप ताम्हाणे , रमेश मते , शहर प्रमुख अभिषेक सुर्वे , शहर संघटक नदीम खान , उपशहर प्रमुख मोहन भोईर , भाजप नेते सुनील गोगटे , जिल्हा चिटणीस दिपक बेहरे , नरेश थोरवे , शशिकांत देशमुख , राजेश भगत , उपशहर प्रमुख दिनेश कडू त्याचप्रमाणे शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी , युवा सेना व शिवसैनिक मोठ्या संख्येने या अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित होते.

यावेळी खासदार आप्पासाहेब बारणे यांनी ” उत्तर रायगड जिल्हा प्रमुख पदी ” संतोषशेठ भोईर यांची नियुक्ती करून त्यांना वाढदिवसाची अनोखी भेट दिली .यावेळी त्यांनी सर्व पदाधिकारी यांनी नागरिकांच्या हिताची कामे करा , असा सल्ला दिला.
टिकेला उत्तर न देता विकास करणारे नेतृत्व मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्या रूपाने आपल्याला महाराष्ट्रात मिळाले आहे , असे सांगून संतोषशेठ भोईर यांच्याकडे संघटन कौशल्य असल्याने येणाऱ्या काळात पक्ष वाढीसाठी आपण काम करू , सर्व निवडणुकीत कार्यकर्त्यांना बळ देवू , जनता आपल्या पाठीशी आहे , विजय आपलाच आहे , हे सांगितले.
तर आमदार भरतशेठ गोगावले यांनी बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित असलेली शिवसेना अशी डगमगणारी नाही , आपली पुन्हा सत्ता येणार , शिवसैनिक आपली ताकद आहे , खासदार आमदार तुमच्या सोबत आहेत , मुख्यमंत्री देखील तुमच्या पक्षाचे आहेत , कर्जत खालापूर क्षेत्रात आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या माध्यमातून ग्रामीण भाग , शहरी भागात निधी वापरून विकास होत आहे , यावर प्रकाश टाकला.
आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी ” पालकमंत्री हटाव ” हा हट्ट तुमचा होता , म्हणून तुम्ही पालकमंत्री होणारच ,असे आमदार भरतशेठ गोगावले यांना उद्देशून घोषणा केली . सत्तापालट होवून झालेल्या घडामोडीत आपल्या बाजूने ऐतिहासिक निकाल लागला , व संतोषशेठ भोईर सारखा भक्कम शिलेदार माझा पाठीशी उभा राहिला , अभ्यासू , संघटन कौशल्य असलेला नेता आहे , त्यांना आजवर जबाबदारी दिली नसेल पण आज त्यांना जिल्हा प्रमुख पदाची गोड बातमी त्यांच्या वाढदिवशी दिली असल्याचे सांगितले .

तर नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख संतोषशेठ भोईर यांनी उत्तर रायगड जिल्हा प्रमुख म्हणून माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे , या पदाला साजेसे मी सर्व पदाधिकारी , युवा सेना , महिला आघाडी व शिवसैनिकांना बरोबर घेवून पक्ष वाढीस व येणाऱ्या सर्व निवडणुकीत पक्षाला यश प्राप्त करण्यास प्रयत्न करीन , अशी ग्वाही दिली , तर विक्रमी मतांनी आमदार महेंद्र शेठ थोरवे आणि खासदार आप्पासाहेब बारणे यांना निवडून आणीन , असे मत व्यक्त केले . यावेळी अनेक शिवसेना – महिला आघाडी – व युवा सेना पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.
- Advertisment -

You cannot copy content of this page