Friday, October 18, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळ्यातील निकृष्ट दर्जाचे रस्ते बनविणाऱ्या ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी..

लोणावळ्यातील निकृष्ट दर्जाचे रस्ते बनविणाऱ्या ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी..

लोणावळा (प्रतिनिधी):लोणावळा नगरपरिषददेणेनव्याने बनविलेले रस्ते निकृष्ट दर्जाचे असून त्यामुळे होणाऱ्या अपघातांना सर्वस्वी जबाबदार नगरपरिषद प्रशासन आहे. तर हे रस्ते त्वरित दुरुस्त करून संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी अन्यथा आम्ही कारवाई करू याबाबतचे निवेदन मानव अधिकार संरक्षण संघटना लोणावळा, मावळच्या वतीने मुख्याधिकारी पंडित पाटील यांना देण्यात आले.
लोणावळा शहरात जी निष्कृष्ट दर्जाची रस्त्याची कामे झाली आहेत आणि त्यामुळे दैनंदिन अपघात होत आहेत व ही रस्त्याची कामे ज्या ठेकेदारांमार्फत व अधिकाऱ्यांच्या संमतीने झाली आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हावी म्हणून संघटनेमार्फत पत्र देण्यात आले.निकृष्ट दरज्याच्या रस्त्यांमुळे अपघात होऊन अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. त्यातच नुकताच झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले भांगरवाडी येथील मनोज भोसले यांच्या औषध व पुढील उपचाराचा खर्च नगरपरिषद मार्फत करण्यात येईल असे आश्वासन मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी दिले आहे.व लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती देखील करण्यात येईल आणि संबंधित व्यक्तींवर कारवाई देखील करण्यात येईल अशा आश्वासीत करण्यात आले.
यावेळी मानव अधिकार संरक्षण संघटनेचे मावळ तालुका कार्याध्यक्ष निरंजन कांबळे,मावळ तालुका सचिव जे.के.गरड,लोणावळा शहराध्यक्ष योगेश पैलकर,लोणावळा शहर उपाध्यक्ष उदय बोभाटे,सदस्य हाजी अब्बास खान आदीजण उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page