if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोनावळा (प्रतिनिधी): लोणावळा शहरात चोरट्यांनी धुमाकूळ माजवीला आहे. काल कोणीतरी अज्ञात चोरट्याने फ्लॅटचा कडी कोयडा तोडुन तब्बल 2 लाख 82 हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना नांगरगाव येथील सोसायटीत घडला आहे.
याबाबत राजेंद्र दादुराव कानलकर (वय 52, रा. फ्लॅट नं.201, बी. विंग, साई पार्क टाऊन, किवळे )यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. सदर फिर्यादेवरून अज्ञात चोरट्या विरोधात गु. रजि. नं.223/2023 भा द वि का. कलम 380,454,457,प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहिती नुसार नांगरगावातील फ्लोरा सोसायटीतील फ्लॅटचा कडी कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्याने तब्बल 2,82,000 चा मुद्देमाल लंपास केला. लंपास केलेल्या मुद्देमालात 1, 05,000 /- रोख रक्कम, 45,000/- एक 15 ग्रॅम वजनाची सोन्याची लेडीज चैन, 60,000/- एक 20 ग्रॅम वजनाचा सोन्याचा लक्ष्मीहार, 12,000/- एक 4 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र पेंडेट, 15,000 /- दोन पांढरे खडे असलेल्या सोन्याच्या आंगठ्या प्रत्येकी 7500 किमतीच्या,दोन साधी सोन्याच्या अंगठ्या प्रत्येकी 7500 रुपये 30,000 /- चार कानातले सोन्याचे रिंग प्रत्येकी 7500 रुपये असा एकूण 2,82000 /- रु. किंमतीचा मुद्देमाल चोरी करुन नेला आहे.
लोणावळा शहर पोलीस स्टेसन मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या आदेशान्वये सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश बावकर करत आहेत.