Saturday, October 19, 2024
Homeपुणेलोणावळाअण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव 2023 च्या अध्यक्षपदी एकनाथ घोरपडे यांची निवड जाहीर…

अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव 2023 च्या अध्यक्षपदी एकनाथ घोरपडे यांची निवड जाहीर…

लोणावळा (प्रतिनिधी): साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मातंग समाज लोणावळा शहराध्यक्ष सोमनाथ जयसिंग बोभाटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव 2023 च्या अध्यक्षपदी एकनाथ घोरपडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.तर कार्याध्यक्ष पदी मनोज भाऊ खुडे,उपाध्यक्ष पदी अशोक दादासाहेब बोभाटे,खजिनदार पदी नाना रोकडे व खंडु बोभाटे,आणि सेक्रेटरी पदी संतोष थोरात यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी लोणावळा शहरातील तसेच खंडाळा शहरातील समाज बांधव मोठया संख्येने या बैठकीला उपस्थित राहून ही बैठक यशस्वीरित्या पार पाडण्यात आली.
यावेळी मातंग समाज लोणावळा शहर उपाध्यक्ष विकास साठे, कार्याध्यक्ष विजय साबळे,विक्रम बोभाटे, सेक्रेटरी अभय लोंढे, उदय बोभाटे, विश्रांत साठे, कृष्णा साबळे, आकाश लोंढे, अभिजीत फाजगे,रितेश बोभाटे, बाळासाहेब बोभाटे, नितीन जवळकर,आनंद बोभाटे, योगेश पाटोळे, निलेश लांडगे, यश बोभाटे,संदीप बोभाटे, अजिंक्य बोभाटे, शेखर बोभाटे, प्रवीण मखरे आदी मान्यवर उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page