Friday, October 18, 2024
Homeपुणेमावळमावळात काळीज पिळवटणारी घटना,83 वर्षीय वृद्ध आज्जीला बटाटा मागितला म्हणून सोडले रस्त्यावर…

मावळात काळीज पिळवटणारी घटना,83 वर्षीय वृद्ध आज्जीला बटाटा मागितला म्हणून सोडले रस्त्यावर…

मावळ (प्रतिनिधी):घरी एकट्या असलेल्या आजीला बटाटा आवडत असल्याने त्या शेजाऱ्यांकडे बटाटा मागण्यासाठी गेलेल्या वृद्ध आज्जीना मारहाण करून रस्त्यावर सोडण्यात आले. ही काळीज पिळवाटून टाकणारी घटना परंडवडी येथे उघडकीस आली.
राधाबाई गोसावी (वय 83, रा. कुसगांव, ता. मावळ )असे आज्जीचे नाव असून परंदवडी पोलीस पाटील व वन्यजीव रक्षक संस्थेचे सदस्य व किनारा वृद्धाश्रमातील सदस्यांनी त्या आज्जीस किनारा वृद्धाश्रमात सोडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार परंदवडीचे पोलीस पाटील यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे यांना माहिती दिली की, इंदिरा कॉलेज रोड, परंदवडी येथे एका वृद्ध महिलेला रस्त्याच्या बाजूला सोडले आहे. गराडे यांनी किनारा वृद्धाश्रमास माहिती दिली. त्यानुसार किनाराची एक टीम परंदवडी येथे गेली. तिथे असलेल्या वृद्ध आजीला पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले आणि वृद्धाश्रमात आणले आणि त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती किनारा वृद्धाश्रमाच्या संचालिका प्रिती वैद्य यांनी दिली.
आजींना एक मुलगा असून तो मुंबई येथे असतो,अशी माहिती आजींनी दिली. किनारा वृद्धाश्रमाकडून आजींच्या नातेवाईकांचा शोध घेतला जात असताना आजीचे नातेवाईक मिळून आले आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page