Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदी माजी राजिपचे अध्यक्ष सुरेशदादा टोकरे यांची वर्णी...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदी माजी राजिपचे अध्यक्ष सुरेशदादा टोकरे यांची वर्णी !

भिसेगा व – कर्जत ( सुभाष सोनावणे ) महाराष्ट्राच्या राजकारणात अचानक झालेल्या उलथापालथीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुभंगला असून राष्ट्रवादी काँग्रेसमधून रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद भूषविणारे माजी अध्यक्ष सुरेश दादा टोकरे यांची वर्णी दस्तुरखुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाच्या राजकारणातील हुक्कमी एक्का असलेले शरदचंद्र पवार साहेब यांनी रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदी निवड केली आहे.

राजिपचे माजी अध्यक्ष सुरेश दादा टोकरे हे आगरी समाज रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत . ते गेली ३० वर्षे रायगडच्या राजकारणात असून त्यांचा राजकीय अभ्यास दांडगा आहे . नेरळ सारख्या परिसरातील आंबिवली त्यांचे गाव असून मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे तरुण वर्गाची फळी आहे . माणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच ते रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास असून कर्जत – खालापुर विधानसभेचे माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांचे ते खंदे समर्थक म्हणून आजवर त्यांची ओळख आहे.
कर्जत तालुक्यातील राजकारणावर त्यांची चांगली पकड असून त्यांना मानणारा मोठा वर्ग त्यांच्या सोबत असल्याने आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाढ ते योग्य करतील म्हणूनच अगदी विश्वासू सहकारी म्हणून त्यांच्या खांद्यावर राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांनी त्यांना रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून धुरा दिली आहे.

कर्जत – खालापुर विधानसभा मतदार संघात अनेक पदाधिकारी खासदार सुनिल तटकरे यांच्या सोबत अजित दादा पवार गटात गेले असल्याचे चित्र असले तरी कार्यकर्ते मात्र अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत . या मतदार संघात माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांनी तीन वेळा विधानसभेत निवडून येवून विक्रम केला असल्याने येथील मतदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा , तसेच शरदचंद्र पवार साहेब व माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांना मानणारा असल्याने भविष्यात नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष सुरेश दादा टोकरे यांचे राष्ट्रवादीत शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली रहाणे , या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असून त्यांना मिळालेले जिल्हाध्यक्ष पदाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळणार असून त्यांचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन होत आहे . याचा फायदा येणाऱ्या जिल्हा परिषद , पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकीत पहाण्यास मिळेल , हे त्रिवार सत्य आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page