Friday, October 18, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळ्यातील मंजुश्री वाघ यांची राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश महिला सचिवपदी नियुक्ती…

लोणावळ्यातील मंजुश्री वाघ यांची राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश महिला सचिवपदी नियुक्ती…

लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळ्यातील तडफदार महिला नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंजुश्री वाघ यांची राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश महिला सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर व मावळचे आमदार सुनील(अण्णा)शेळके यांच्या मार्फत याबाबतचे नियुक्ती पत्रक देण्यात आले आहे.
2004-05 साली महिला दक्षता समिती लोणावळा शहर व महिला दक्षता समिती पुणे जिल्हा यावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. 2007 साली सरसेनापती उमाबाई दाभाडे पतसंस्थेच्या संचालिका झाल्या व पुढे मावळ अँग्रो टुरिझमच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना पर्यटन व्यावसाय सुरु करण्यासाठी मदत व मार्गदर्शन केले.
लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा म्हणून त्यांनी साडेपाच वर्ष महिलांची जबाबदारी सांभाळली. त्याच काळात त्यांनी महिलांसाठी रणरागिणी ग्रुपची स्थापना करत महिलांना खुले व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. त्या माध्यमातून महिलांसाठी त्यांनी अनेक भव्य दिव्य कार्यक्रम व उपक्रम राबविले आहेत.तसेच लोणावळा शहर विकास प्रतिष्ठानच्या त्या संस्थापक कार्याध्यक्ष आहेत.
त्यांच्या आक्रमक व तडफदार स्वभाव आणि त्यांचे कार्यपद्धती लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर व मावळचे आमदार सुनिल(अण्णा)शेळके यांनी त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश महिला सचिव पदाची मोठी जबाबदारी दिली आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page