Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडराज्यातील चालू घडामोडीमुळे कर्जत नगर परिषदेत सत्ताधारी कोण आणि विरोधी पक्ष कोण...

राज्यातील चालू घडामोडीमुळे कर्जत नगर परिषदेत सत्ताधारी कोण आणि विरोधी पक्ष कोण हेच समजत नाही !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) ” राजकारणाची झालीय भेळ……लावल रताळ आलंय केळ……” , अशी म्हणायची वेळ सध्याच्या राज्याच्या राजकीय घडामोडीत दिसून येत आहे . आपले नेते नक्की कुठे आहेत , फुटलेला पक्ष नक्की कुठल्या नावाचा आहे , अधिकृत आहे की , अनाधिकृत , हेच कार्यकर्त्यांना समजेनासे झाले आहे.
त्याचा परिणाम मात्र नागरिकांच्या समस्या व अडचणी वाढलेल्या दिसून येत असून सत्ताधारी पक्षाला विरोध करायचा की नाही , अशी ” अवघड जागी दुखणं ” असलेली परिस्थिती राज्यकर्त्यांची होवून बसली आहे . राज्यात भाजपा – शिवसेना ( शिंदे गट ) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( अजित दादा पवार गट ) अशी महाआघाडी की महायुती असे अचानक झालेले समीकरणांमुळे कार्यकर्ता मात्र सैरभैर झालेला दिसून येत आहे . अशीच काहीशी परिस्थिती कर्जत नगर परिषदेत झालेली दिसून येत आहे.

सन २०१९ साली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँगेस पक्ष या प्रमुख पक्षाबरोबर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष – महाराष्ट्र नवनिर्माण सेना – बी एस पी आदी पक्ष विरोधात शिवसेना – भाजपा – आरपीआय ( आठवले गट ) अशी महायुती होती , तर नगराध्यक्ष पद हे थेट मतदारांत महिला सर्वसाधारण निवडून जाणार होते , त्यावेळी महायुतीने बाजी मारत थेट नगराध्यक्ष व १० उमेदवार जिंकून कर्जत नगर पालिकेत सत्ता स्थापन केली होती.
तर महाआघाडीतील राष्ट्रवादीचे ८ उमेदवार निवडून आले होते , मात्र राज्यातील या अगोदर असलेले शिवसेना – राष्ट्रवादी या प्रमुख पक्षाची सत्ता असल्याने कर्जत न. प. मध्ये एकमेकांच्या विरोधी असल्याने नेमकी राष्ट्रवादीची गोची झालेली दिसली . अनेक समस्या कर्जतमध्ये असताना व पाण्याची गंभीर समस्येबद्दल राष्ट्रवादीने ” ब्र ” देखील न काढता आपला ” सावत्रपणा ” दाखविला नाही . तर त्यावेळी राज्यातील विरोधी पक्ष असलेला भाजपा पालिकेत मात्र उपनगराध्यक्ष पदावर विराजमान होता , त्यामुळे ” बाहेर एक , गल्लीत एक ” असे दूषित वातावरण कर्जतमध्ये पहाण्यास मिळाले .
तर एक वर्षापूर्वी शिवसेना ( शिंदे गट ) व भाजपाची तर आता पुन्हा शिवसेना ( शिंदे गट ) – भाजपा – राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) अशी राज्यात सत्ता असताना पालिकेतील लोकप्रतिनिधी नक्की कुठल्या गटाचे आहेत , तेच समजेनासे झाले आहे.
शिवसेना ( ठाकरे गट ) तर राष्ट्रवादीचे नगरसेवक साहेबांच्या की दादांच्या गटाचे हे नक्की व्हायचे आहे .तर स्वीकृत नगरसेवक पदी शिवसेना ( शिंदे गट ) तर एक मनसे चा स्वीकृत नगरसेवक आहे . भाजपा जरी स्थिर असली तरी शिवसेना व राष्ट्रवादी दुभंगली गेली असल्याने पुढील निवडणुकीचे समीकरण डोळ्यासमोर ठेवून नागरिकांच्या समस्या जाणून सत्ताधारी पक्षाला नामोहरण करण्याची ताकद कुठल्या लोकप्रतिनिधींच्या अंगात उरली नाही की काय ? असा संतप्त सवाल कर्जतमध्ये कर्जतकर करताना दिसत आहेत.
गत वेळेची राष्ट्रवादीची सत्ता घालवताना शिवसेनेने केलेली आंदोलनामुळेच राष्ट्रवादीची सत्ता गेली होती , मात्र आता सर्वच पक्षांत ” मरगळ ” आलेली असून कर्जतमध्ये नागरिकांच्या समस्यांचा डोंगर असताना कोणीच सत्ताधारी पक्षांच्या विरोधात आंदोलन , मोर्चे , उपोषणे करताना दिसत नाहीत.
- Advertisment -

You cannot copy content of this page