Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमनोज सानप यांच्या जागी रायगडच्या जिल्हा माहिती अधिकारीपदी मनिषा पिंगळे यांची नियुक्ती...

मनोज सानप यांच्या जागी रायगडच्या जिल्हा माहिती अधिकारीपदी मनिषा पिंगळे यांची नियुक्ती !

भिसे गाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) सर्व पत्रकारांना सामांजसपणाची वागणूक देत , त्यांच्या तक्रारींचे निरसन करत अल्पावधीतच आपल्या शांत स्वभावाने , व दिलखुलास हास्याने प्रसिद्ध असलेले मनोज सानप यांच्या जागी रायगडच्या जिल्हा माहिती अधिकारीपदी मनिषा पिंगळे या रुजू झाल्या आहेत. जिल्हा माहिती कार्यालय,रायगड – अलिबाग येथील जिल्हा माहिती अधिकारी या पदी प्रशासकीय बदलीने नियुक्ती झाली असून जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मनोज शिवाजी सानप यांचेकडून त्यांनी आज स्वीकारला.
यावेळी उपस्थित माध्यम प्रतिनिधी व मान्यवरांनी जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती पिंगळे यांचे स्वागत केले तसेच ठाणे जिल्हा माहिती अधिकारी पदावर बदली झालेले मनोज सानप यांना प्रेमभराने निरोप दिला.जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती मनीषा पिंगळे यांनी यापूर्वी मंत्रालयात तत्कालीन गृहमंत्री यांच्या जनसंपर्क अधिकारी म्हणून तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात प्रकाशने शाखेत वरिष्ठ सहाय्यक संचालक म्हणून व विभागीय संपर्क अधिकारी पदावर काम केले आहे. याबरोबरच पालघर जिल्ह्याच्या प्रथम जिल्हा माहिती अधिकारी व ठाणे जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हा माहिती अधिकारी म्हणून त्या कार्यरत होत्या. या कालावधीत अनेक वैशिष्ट्यपूर्ण शासकीय उपक्रमांसाठी काम करताना त्यांनी योगदान दिले आहे.

तसेच किरण रा.वाघ यांची जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग येथील रिक्त असलेल्या माहिती अधिकारी या पदी प्रशासकीय बदलीने नियुक्ती झाली असून त्यांनी देखील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page