Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडपोलीस मित्र संघटनेचे कोकण प्रदेश अध्यक्ष रमेश दादा कदम यांचे कर्जतमध्ये आमरण...

पोलीस मित्र संघटनेचे कोकण प्रदेश अध्यक्ष रमेश दादा कदम यांचे कर्जतमध्ये आमरण उपोषणाला सुरुवात !

७० वर्षीय डॉ.दिनकर सरोदे घर बांधकाम प्रकरणी देणार न्याय…

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुका हा आदिवासी – कष्टकरी – गोरगरीब कामगार – दीन दुबळे – हातावर कमावणाऱ्या चाकरमनी यांचा तालुका आहे . मुंबईच्या हाकेच्या अंतरावर असल्याने येथील राजकीय परिस्थिती नेहमीच गरमागरम चर्चेने गजबजलेली असते . नेमका याच परिस्थितीचा फायदा येथील मुर्दाड शासकीय यंत्रणा घेत असते.पाच आकडी पगार , आलिशान गार हवेची केबिन , दिमतीला नोकरवर्ग , खुर्चीला ऊब येईपर्यंत ” बुजगावणे ” सारखे बसून कामाच्या बाबतीत कर्तव्यात कसूर करणारी हि गेंड्याच्या कातडीची अधिकारी वर्ग त्यामुळे सर्वच कार्यालयाच्या संबंधातील कामे डोंगरा एव्हढी वाढलेली.
मग कर्जतकरांनाच या विरोधात आंदोलने – संतप्त निदर्शने – मोर्चे – आमरण उपोषण – प्राणांतिक उपोषण आदींचा मार्ग स्वीकारावा लागतो , हा आज पर्यंतचा इतिहास आहे . मात्र उपोषणकर्त्याला कधीच हे अधिकारी वर्ग सामंजस्यपणाची भूमिका घेवून यावर काही तोडगा तर प्रसंगी आपल्या खालच्या संबंधित अधिकाऱ्याला फटकारून मार्ग काढताना दिसत नसल्याने प्रसंगी उपोषणाच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्था बिघडवन्यास कारणीभूत ठरतात . अश्या कर्तव्यात कसूर करणारे अधिकारी वर्गाची कर्जत तालुक्यातून हकालपट्टी का करू नये ? असा संतप्त सवाल या उपोषणाच्या माध्यमातून उमटत असतात.

कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे होत असताना , घर बांधण्यासाठी सर्व बांधकाम परवानग्या , कागदपत्रे देऊनही तसेच सर्व कर भरूनही राजकीय दबावाखाली येऊन , वरिष्ठांच्या आदेशाला न जुमानता ” हम करे सो , कायदा ” असा अजेंठा सध्या नेरळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक गणेश गायकर हे वापरत असल्याचा आरोप सुगवेकर आळी येथील प्रसिद्ध डॉ. दिनकर सरोदे व त्यांच्या पत्नी डॉ .सुनीता सरोदे यांनी यापूर्वी केलेला असताना कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे व मा. कार्यकारी अभियंता ( बांधकाम ) राजिप यांचा आदेश देखील ग्रामसेवक जुमानत नसुन त्यांच्या अश्या पिळवणूक केल्याने मानसिक तणावाखाली आलेले डॉ. सरोदे शासकीय अधिकारी वर्गाने त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याची वेळ आणली असल्याचे मत देखील यापूर्वी मांडले आहे , त्यामुळे यानिमित्ताने नेरळ ग्रामपंचायतीचा ढोबळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

नेरळ ग्रामपंचायत हद्दीत सुगवेकर आळी येथे गेली ३० वर्षांपासून डॉ. दिनकर सरोदे व त्यांच्या पत्नी डॉ. सुनीता सरोदे या जुन्या घरातच प्राथमिक चिकित्सालय चालवीत होते . जुने झालेल्या घराच्या जागी नवीन बांधकाम करण्यासाठी त्यांनी नेरळ ग्रामपंचायती कडे बांधकाम परवानगी मागितली असता येथील ग्रामसेवक गणेश गायकर यांनी आजपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना त्रास देऊन पिळवणूक केली आहे.
शासन नियमानुसार डॉ. सरोदे यांचे बांधकाम दुरुस्ती १५० चौ. मी. च्या आतील व गावठाण हद्दीत असल्याने UDCPR मध्ये दिलेल्या तरतुदी नुसार ग्रामपंचायत नेरळ यांनीच बांधकाम परवानगी देणे गरजेचे असल्याचे मा. कार्यकारी अभियंता ( बांधकाम ) रायगड जिल्हा परिषद , अलिबाग यांनी आदेश दिलेले असतानाही व तसाच आदेश पंचायत समिती कर्जतचे गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांनी दिला असतानाही ग्रामसेवक गणेश गायकर यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवत अद्याप पर्यंत डॉ. सरोदे यांना बांधकाम परवानगी दिलेली नाही.

याबाबतीत डॉ.सरोदे यांनी ग्रामपंचायती कडे विकास कर २५२ ९६० / – रू. व कामगार विकास शुल्क ११७७९ /- रू . इतका भरूनही व ग्रामसेवक गणेश गायकर यांना बांधकाम परवानगीची सर्व कागदपत्रे देऊनही ते कुणाच्या दबावाखाली येऊन बांधकाम रोखून धरत आहेत , बांधकाम करण्यास परवानगी का देत नाहीत ? इतका कर कसला , याची चौकशीसाठी व जेष्ठ नागरिक असलेले ७० वर्षीय डॉ. दिनकर सरोदे व त्यांच्या पत्नी दिड वर्षांपासून मानसिक तणावाखाली असल्याने त्यांची तक्रार पोलीस मित्र संघटनेकडे आल्याने आता ” बेजबाबदार शासकीय अधिकारी वर्गांचे कर्दनकाळ असलेले ” पोलीस मित्र संघटनेचे कोकण प्रदेश अध्यक्ष रमेश दादा कदम डॉ. सरोदे यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढे सरसावले असून आज दिनांक १९ जुलै २०२३ पासून लोकमान्य टिळक चौक – कर्जत येथे भर पावसात आमरण उपोषणास बसले आहेत .त्यांचे हे १७ वें आमरण उपोषण असल्याने या प्रकरणाकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page