if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी):आई एकविरेचे माहेरघर असणाऱ्या देवघर येथील श्री कालभैरवनाथ मंदिर व जेवरेवाडी येथील श्री गजानन महाराज मठ येथील भाविक व पर्यटकांच्या होणाऱ्या गैरसोयीसाठी मुबलक निधी उपलब्ध व्हावा या आशयाचे निवेदन एकलव्य फौंडेशनच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.
देवघर येथील श्री कालभैरवनाथ मंदिर व जेवरेवाडी येथील श्री गजानन महाराज मठ येथे येणाऱ्या लाखो भाविकांना रस्ते, पाणी, निवारा शेड, वाहनतळ आदी समस्याचा भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. आणि येथे येणाऱ्या भाविक व पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी मुबलक निधी उपलब्ध करून द्यावा याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विधानभवन मुंबई येथे जाऊन प्रत्यक्ष निवेदन देण्यात आले.यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याठिकाणासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
तसेच देवघर येथील तलाव आणि जेवरेवाडी येथील तलावास सुशोभीत करण्यासाठी निधी द्यावा जेणेकरून स्थानिक तरुणांना येथे रोजगार उपलब्ध होऊ शकतो असे एकलव्य फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी सुचित केले.
यावेळी एकलव्य फौंडेशनचे ओंकार पवार, विजय देशमुख, विकास धोत्रे, अविनाश देसाई,राहुल वाटाणे,सुनील पवार, संतोष कुसाळकर,किरण विटेकर, महादेव भवर आणि प्रवीण देशमुख इ. सदस्य विधानभवन मध्ये उपस्थित होते.