मुळशी : प्रतिनिधी आंबवणे दि.24 रोजी सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालय आंबवणे तालुका मुळशी जिल्हा पुणे येथील इयत्ता 8 वी ते 10 वी च्या सर्व विद्यार्थ्यांना एकूण दहा दिवसासाठी “सुंदर माझे मन, सुंदर माझे हस्ताक्षर..” आनंदी माझे मन, आनंदी माझे वाचन “हा उपक्रम विद्यालयात राबवण्यात आला.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री देवरे म्हणाले की, लेखन व वाचन सुधारण्या साठी विद्यार्थ्यांच्या भावना विस्तारण्यासाठी, स्व मत मांडण्यासाठी दैनंदिन जीवनात घडणाऱ्या व्यवहारातील विषयावर आधारित दहा ते बारा ओळी लिहून त्यांच्या विचारांना वाट मोकळी करून देण्याच्या दृष्टीकोन समोर ठेऊन हा उपक्रम राबवला.त्यात पाठ्य घटकावर आधारित लिखाणासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सुंदर हस्ताक्षर उपक्रमात सहभाग घेतला.
तसेच वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी थोर महापुरुषांची चरित्र वाचन उपक्रम ही या निमित्ताने दररोज शाळेत आयोजित केला.यामुळे विद्यार्थ्यांना लेखन वाचन ची आवड निर्माण होईल. थोरामोठ्यांची चरित्र कळतील. असे स्तुत्य उपक्रमाने विद्यार्थ्यांना निश्चित मदत होईल.असे आदर्श सरपंच सौ. वत्सलाताई वाळंज म्हणाल्या.व कौतुक केले.या उपक्रम यशस्वीते साठी शिक्षक व कर्मचारी यांनी मेहनत घेतली व दररोज चे उत्कृष्ट नियोजन केले.