if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
मावळ (प्रतिनिधी):महाराष्ट्र शासन वनविभाग- पुणे,रोटरी क्लब ऑफ मावळ व काव्या करिअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने 8000 देशी वृक्षांचे भव्य वृक्षारोपण गुरुवार दिनांक 27 जुलै रोजी परंदवडी तालुका मावळ येथील वन विभागाच्या जागेत संपन्न झाले.
जुलै महिना हा रोटरी मावळच्या माध्यमातून वृक्ष लागवड व संवर्धन महिना म्हणून साजरा केला जात आहे.या महिन्यातल्या वृक्षारोपणाचा हा तिसरा भव्य प्रकल्प रोटरी मावळच्या माध्यमातून पार पडला.या प्रकल्पासाठी वन विभाग व काव्या करिअर अकॅडमीचे मोलाचे सहकार्य लाभल्याबद्दल रोटरी मावळचे अध्यक्ष रो.सुनील पवार यांनी दोघांचे आभार मानले.
वडगाव मावळचे वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या प्रकल्पासाठी वडगांव वनपाल एम.एस.हिरेमठ, वनरक्षक परमेश्वर कासुळे, बेबेडोहळ वनरक्षक योगेश कोकाटे,रोटरी मावळचे अध्यक्ष रो.सुनील पवार,सेक्रेटरी रो.रेश्मा फडतरे,प्रकल्प प्रमुख रो.निलेश गराडे, रो.ॲड.दीपक चव्हाण, रो.पुनम देसाई, रो.मयूर गायकवाड,काव्या करिअर अकॅडमीचे संस्थापक शंकर हुरसाळे, सकाळचे पत्रकार संतोष थिटे यांच्यासह काव्या करिअर अकॅडमीचे 100 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
पावसाच्या संततधारेत या काव्या करिअर अकॅडमीच्या प्रशिक्षणार्थींचा वृक्षारोपणाचा उत्साह दांडगा होता. वनविभागातर्फे एम.एस.हिरेमठ यांनी याप्रसंगी उपस्थित प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
तर रोटरी मावळच्या वतीने रो.सुनील पवार व रो.रेश्मा फडतरे यांनी मनोगत व्यक्त केले.रो.निलेश गराडे यांनी भविष्यात आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवल्यास वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या वतीने या प्रशिक्षणार्थींकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली.शंकर हुरसाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले व प्रशिक्षणार्थींकडून समाजाला लागेल ती मदत करण्याची ग्वाही दिली.