Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" कर्तुत्वाला - कार्याची जोड " , शिवसेना कर्जत शहर संघटक -...

” कर्तुत्वाला – कार्याची जोड ” , शिवसेना कर्जत शहर संघटक – शिवभक्त ” नदीम भाई खान ” यांचा वाढदिवस सामाजिक कार्याने उत्साहात साजरा !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आपल्या ” कर्तृत्वाला कार्याची जोड ” देवून आपल्या हातून सत्कर्म करणे हे भाग्याची गोष्ट आहे . शिवसेनेच्या धगधगत्या अग्निकुंडातील ” स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब ” यांचे प्रखर विचारांनी सदैव मदतीचा हात पुढे करणारे ” दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस ” म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते , असे दानवीर शिवसेना शहर संघटक नदीम भाई युसुफ खान यांचा वाढदिवस सामाजिक कार्याने उत्साहात साजरा करण्यात आला.

वाढदिवस हे जरी निम्मित असले तरी नदीम भाई खान हे वर्षाच्या बारा महिने परोपकारी होवून नेहमीच मदत करत असतात . आपल्या कर्जत – खाटीक आळी येथील जनसंपर्क कार्यालय ” महेंद्र गड ” येथून ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे ” सर्वधर्म समभाव हे स्फूर्तिदायक प्रेरणादायी विचार ” घेऊन समाजात काम करत असताना संपूर्ण मानव जातीला स्वातंत्र्य – समता – बंधुता – न्याय तसेच इतर हजारो अधिकार संविधानाच्या माध्यमातून देणारे महामानव विश्वरत्न ” डॉ . बाबासाहेब आंबेडकर ” यांच्या समतेच्या कार्याला डोळयासमोर ठेवून व लहानपणापासून कर्जतचा ” ढाण्या वाघ ” म्हणून संबोधले जाते , असे प्रेमळ व सर्वांनाच मदतीचा हात देऊन जनमाणसात आदरयुक्त दबदबा असणारे ” स्वर्गीय अनंत काका जोशी ” यांच्या मुशीत वाढणारे , शिवसेनाच माझी जात असे मानणारे शिवभक्त नदीम भाई युसूफ खान मुस्लिम , बौद्ध , हिंदू , तसेच इतर समाजाच्या प्रत्तेक कार्यक्रमात ते अग्रेसर रहात असून सामाजिक क्षेत्रात देखील त्यांचा सतत मदतीचा हात असतो.
कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या संपर्कात राहून कुठे कुणाचा अपघात झाला तर ते मानवतेच्या दृष्टीने तातडीने उपजिल्हा रूग्णालयात धाव घेतात , कुणाची समस्या असल्यास शासकीय कार्यालयात जाऊन लगोलग सोडवितात , कुणाचे दाखले , रेशन कार्डाचे काम , निराधार महिलांसाठी पेन्शनचे काम , जातीचे दाखले , कुणाचे वीज कंपनीत बिलाचे काम , पालीकेतील कुणाची समस्या असो , शैक्षणिक क्षेत्रात तर ते स्वताच्या पैशाने गोरगरीब विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेऊन देतात . गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप , शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम घेऊन होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देतात , आरोग्य शिबीर , रक्तदान शिबिर , घेऊन देशव्यापी कार्य देखील ते करतात , कोरोना काळात ही त्यांनी गरजू व गोरगरीब कुटुंबांना दैनंदिन लागणारे वस्तू , राशन धान्य , देण्याचे महत्वपूर्ण कार्य केले . कोरोना लसीकरण शिबिर भरवून नागरिकांना कोरोना लस देऊन त्यांचे आरोग्य सांभाळले , जेष्ठ नागरिक व जे अंथरुणावर पडून आहेत अश्या रुग्णांना घरी जाऊन कोरोना लसीकरण करून घेतले , कोरोना काळात मास्क वाटप , हात स्वच्छ करण्याचे औषधी साहित्य वाटप , स्वच्छता अभियान अशी कामे त्यांनी पोट -तिडकिने केले . गोरगरीब तसेच समाज बांधवांच्या कामासाठी त्यांनी संपर्क कार्यालय उघडले आहे त्या ” महेंद्र गडावरून ” एक बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक – भगवा शिलेदार म्हणून त्यांचे कार्य जोमाने चालू आहे.

यावेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना व युवासेना – कर्जत शहर व आमदार महेंद्रशेठ थोरवे फाऊंडेशन यांच्या माध्यमातून ” उपजिल्हा रुग्णालय – कर्जत ” येथे जीवनावश्यक वस्तु व रुग्णांना फळ वाटप करण्यात आले , तर ” हॅप्पी फल्क फाऊंडेशन ” येथे ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक वस्तु वाटप करण्यात आले , तसेच प्रभाग क्र. ७ मधील पालिकेच्या ” सफाई कर्मचाऱ्यांना ” रेनकोटचे वाटप करण्यात आले.

अश्या या दानविर भगव्या शिलेदाराला कर्जतमध्ये उरूस – ईद – मोहरम कमिटी , त्याचप्रमाणे गणपती उत्सव , माघी गणेश उत्सव , गोकुळाष्टमी , नवरात्र उत्सव कमिटी , नुर ए ईलाही यंग कमिटी- खाटीक आळी , साई मित्र मंडळ , माघी गणेशोत्सव मंडळ , पाटील आळी मित्र मंडळ , धापया देवस्थान समिती , मच्छी मटण मार्केट मित्र मंडळ , सय्यद इशुब शाह बाबा दरगाह कमिटी , कर्जत मस्जिद कमिटी या सर्वांनी सर्वधर्म समभावाची भावना मनात ठेवून , जाती विरहित कार्य करणाऱ्या व स्वर्गीय गुरुवर्य ” धर्मवीर आनंद दिघे साहेब ” व शिवभक्त ” शाबीर भाई शेख ” यांचे विचाराने प्रेरित होऊन छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे नेणाऱ्या सेवकाला ” लोकप्रतिनिधी – नगरसेवक ” बनवून कर्जत नगर परिषदेत नक्कीच पाठवू , अश्या शुभेच्छा त्यांच्या १५ ऑगस्ट दिनी अनेकांनी त्यांना दिल्या.
- Advertisment -

You cannot copy content of this page