Friday, September 20, 2024
Homeपुणेलोणावळासुर साधना गायन क्लासच्या वतीने "ये वतन तेरे लिये"या देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन…

सुर साधना गायन क्लासच्या वतीने “ये वतन तेरे लिये”या देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन…

लोणावळा (प्रतिनिधी):सुर साधना गायन क्लासच्या वतीने जेष्ठ नागरिकांसाठी भारताच्या 76 व्या स्वातंत्रदिनी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रम हा जेष्ठ नागरिक संघ लोणावळा यांच्या सहकार्याने विरंगुळा केंद्रात” ये वतन तेरे लिए” या देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून, सुर साधना गायन क्लासेसचे संचालक प्रदीप वाडेकर ,जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे व पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी कार्यक्रमाला माजी उपनगराध्यक्षा सिंधू कवीश्वर, भाजपा महिला आघाडी अध्यक्षा योगिता कोकरे, महालक्ष्मी मंच च्या सुजाता मेहता, मावळ वार्ता फौंडेशन चे सचिव बापूलाल तारे, आधार फौंडेशनचे अध्यक्ष प्रकाश पाठारे,सदस्य बापूसाहेब कुलकर्णी,डॉ. नामदेव डफळ,प्रशांत पुराणिक,संजय गोळपकर, राजेश मेहता, शत्रुघन खंडेलवाल, जयवंत नलवडे,जेष्ठ पत्रकार श्रीराम कुमठेकर, नीलम कडू, सुरेश गायकवाड, मीनाक्षी गायकवाड, सविता परदेशी,यांच्यासह जेष्ठ नागरिक संघांचे अनेक सदस्य उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात सुर साधना गायन परिवारातील मंगला राणे, सुलभा जगताप, गुरुप्रसाद वासकर, रेखा दाभाडे, किरण कुलकर्णी, संध्या होजगे, दीपाली कांबळे, सोनाली खोब्रागडे, प्रिया देसाई, अश्विनी कडूसकर, वनिता सोमवंशी आणि प्रदीप वाडेकर यांनी देशभक्तीपर गीते गाऊन रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुजा वाडेकर यांनी केले यावेळी जेष्ठ नागरिकांनी हम होगे कामयाब या गाण्यावर ठेका धरला पांडुरंग तिखे, गोरख चौधरी, संध्या गव्हले,मृदुला पाटील, शारदा अगरवाल, प्रतीक्षा महाडिक, ज्योती रांगने, रश्मी सिरस्कर यांनी सहभाग घेतला. तर अशा पद्धतीने स्वातंत्र्यदिन उत्सहात व जल्लोषात साजरा करण्यात आला.
- Advertisment -

You cannot copy content of this page