Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडपुढील कर्जत - खालापुरचे आमदार सुधाकर शेठ घारेच !

पुढील कर्जत – खालापुरचे आमदार सुधाकर शेठ घारेच !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) या कर्जत तालुक्याचा विकास कोणी केला असेल तर तो रायगडचे खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांनी केला आहे , त्यांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास असून ते जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल , अश्या ” लोहपुरुषांच्या ” नेतृत्वाखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बरोबर आम्ही आहोत व तुमच्या या उपस्थितीमुळे आम्ही घेतलेला निर्णय हा योग्यच आहे , हेच आज दिसून येत आहे , असे बहुमोल विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित दादा पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची सर्वसाधारण सभेत , तर अनेक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश कार्यक्रम आज दि. २० ऑगस्ट २०२३ रोजी रॉयल गार्डनच्या भव्य सभागृहात विराट गर्दीने राजिपचे मा. उपाध्यक्ष सुधाकर शेठ घारे यांचे नेतृत्व सर्वांनी मान्य करत उपस्थिती दर्शविली.

यावेळी व्यासपीठावर मार्गदर्शक सुधाकर शेठ घारे यांच्या समवेत प्रदेश सरचिटणीस अशोक भोपतराव व भरत भाई भगत, प्रदेश प्रतिनिधी तथा कर्जत शहर अध्यक्ष भगवान शेठ भोईर , जिल्हा कार्याध्यक्ष हनुमंत शेठ पिंगळे , जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे , जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ दादा धुळे , अशोक शेठ सावंत , शेखर पिंगळे, ज्ञानेश्वर गायकवाड , सुरेश पाटील , जिल्हा सरचिटणीस तथा मा.माथेरान नगराध्यक्ष अजय सावंत , राजेंद्र निगुडकर , दिपक श्रीखंडे , कर्जत ता. अध्यक्ष भगवान शेठ चंचे , कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष एच.आर. पाटील , महिला ता. अध्यक्षा ऍड.रंजना धुळे , युवक ता.अध्यक्ष ऍड.स्वप्नील पालकर , कर्जत तालुका कार्याध्यक्ष शिवाजी खारीक व राजाभाऊ कोठारी , ता. उपाध्यक्ष राम कोळंबे , कर्जत शहर युवक अध्यक्ष सोमनाथ पालकर , त्याचप्रमाणे या सभेला सर्व सेल पदाधिकारी , माथेरान व कर्जत न.प. चे आजी माजी नगरसेवक , जिल्हा परिषद व पंचायत समितीचे माजी सदस्य , ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच , सदस्य , सहकारी संस्थांचे आजी माजी पदाधिकारी , युवक , महिला , विद्यार्थी , युवती , अल्पसंख्यांक , अनुसूचित जाती जमाती या सेलचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व ” न भूतो – न भविष्यती ” असे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी सुधाकर शेठ घारे मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की , ही गर्दी बघून मी भारावून गेलो , राष्ट्रवादी काँगेस पक्ष हे आपले कुटुंब आहे , तटकरे साहेब जे निर्णय घेतील ते योग्य घेतील त्यावर आमचा सर्वांचा विश्वास आहे , तीन पक्ष मिळून घेतलेली उपमुख्यमंत्री पदाची अजितदादांचा शपथविधी प्रसंगी आम्ही मुंबईला होतो , या तालुक्याचा कुणी विकास केला असेल तर ते लोह पुरुष तटकरे साहेब व आदितीताई तटकरे आहेत.
आम्ही राजिप उपाध्यक्ष असताना दोन्ही तालुक्यात जोरदार काम केले , कार्यकर्त्यांची कामे व्हावीत म्हणून कार्यालय उघडले , तर त्यात काय चूक झाली , जर कार्यकर्ते ” भावी आमदार ” म्हणून माझ्याकडे बघत असतील व तसे पोस्टर टाकत असतील तर , यात माझी काय चूक , माझ्या विरोधात कुणी वाईट म्हटल तरी मी आदरच करेन , पण दुसरा कोणी माझ्या विरोधात म्हटला तर मी ” सुधाकर घारे ” कसा आहे , हे सर्वाँना माहित आहे , अशी घणाघाती तोफ त्यांनी डागली , मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे , पक्षाच्या विरोधात जाऊन कधीच काम करणार नाही , पक्षाचे काम करताना आता बूथ कमिटी करण्यावर भर द्यावी लागेल , पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण काम करण्याचे आहे , कार्यकर्त्याला मान देणे गरजेचे आहे , झालेली ही गर्दी यांत पदाधिकारी यांचा सिंहाचा वाटा आहे , असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी अनेक पक्षातील ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँगेस पक्षात प्रमुख मार्गदर्शक सुधाकर शेठ घारे यांच्या उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी अनेक कार्यकर्ते व महिला , युवती यांना पद नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी रॉयल गार्डनचां सभागृह , मधला भाग , जेवायला बसतात तो दोन्ही बाजूचा संपूर्ण परिसर , व्यासपिठाच्या सभोवती , हॉल च्या बाहेर पूर्ण रस्त्यापर्यंत तुफानी गर्दी होती , तर गाड्यांची रांगच रांग , टाळ्यांचा कडकडाट , घोषणांची आतिषबाजी व तुफानी भाषण , यातून मा. राजिप उपाध्यक्ष सुधाकर शेठ घारे यांनी शक्ती प्रदर्शन दाखवून दिले . यावेळी हनुमंत पिंगळे , एकनाथदादा धुळे , भरत भाई भगत, अशोक भोपतराव , राजेंद्र निगुडकर , अंकित साखरे , अजित सावंत , राजाभाऊ कोठारी सर , महिला ता.अध्यक्षा ऍड रंजना धुळे यांनी पुढील भावी आमदार म्हणून सुधाकर शेठ घारे यांना शुभेच्छा व्यक्त केल्या व महत्त्वपूर्ण आपले विचार मांडले.
- Advertisment -

You cannot copy content of this page