Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडबंद असलेले गाळे स्थानिक बेरोजगारांना द्या ,शिवसेनेचा पालिकेला घेराव !

बंद असलेले गाळे स्थानिक बेरोजगारांना द्या ,शिवसेनेचा पालिकेला घेराव !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) गेली पाच वर्षे कर्जत नगर परिषदेच्या ताब्यात असलेले शॉपिंग झोन मधील गाळे आजपर्यंत बंद का , स्थानिक बेरोजगारांना हे गाळे देवून रोजगाराला प्राधान्य द्या , तर पालिकेचा महसूल हि बुडला जातोय , हे जनहितार्थ मुद्दे घेवून शिवसेनेचे कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे यांनी आज कर्जत नगर परिषदेला घेराव घालून संतप्त सवाल केला . मात्र नेहमीप्रमाणे पालिकेचे मुख्याधिकारी हे अनुपस्थित असल्याने हे निवेदन रविंद्र लाड यांच्याकडे देण्यात आले.
याबाबतीत अद्यापपर्यंत या विभागातील लोकप्रतिनिधी यांनी हा तरुणांच्या रोजगाराचा महत्त्वाच्या प्रश्नाबाबत मुद्दा का उपस्थित केला नाही , याबद्दल शिवसेनेच्या वतीने संतप्त नाराजी व्यक्त केली.

कर्जत नगरपरिषद हद्दीतील जुने एस.टी. स्टॅंड, भिसेगाव, कर्जत सर्व्हे नं. २३/२ , मंगलमूर्ती हि इमारत गुंडगे रोडवर आहे . येथील गाळे स्थानिक बेरोजगार युवकांना भाडेतत्त्वावर देणेबाबत कर्जत शिवसेना शहर प्रमुख अभिषेक सुर्वे व हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करणारे कर्जत उपशहर संघटक सचिन खंडागळे यांच्या वतीने मुख्याधिकारी यांना आज दिनांक २९ ऑगस्ट २०२३ रोजी निवेदन देण्यात आले.
भिसेगाव व गुंडगे परिसरातील स्थानिक युवकांच्या मागणीनुसार जुने एस.टी. स्टॅंड, भिसेगाव, कर्जत सर्व्हे नं. २३/२ मंगलमूर्ती इमारती मधील गाळे अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत. सदरील नगरपरिषदेचे गाळे स्थानिक बेरोजगारांना भाडेतत्त्वावर दिल्यास नगरपरिषदेस उत्पन्न सुरु होईल व बेरोजगार तरुणांना व्यवसायाची संधी उपलब्ध होईल. या सर्व विषयासंदर्भात गुंडगे – भिसेगाव परिसरातील स्थानिक युवक व तरुणांच्या वतीने शिवसेना उप शहर संघटक श्री. सचिन चंद्रकांत खंडागळे यांच्या पत्रावर कर्जत नगरपरिषद मुख्याधिकारी यांस निवेदन देण्यात आले , व यावर तातडीने निर्णय घ्यावा असा इशारा देखील देण्यात आला.

यावेळी शिवसेना शहर प्रमुख श्री. अभिषेक सुर्वे , शहर संघटक नदीम भाई खान, शहर सल्लागार अशोक मोरे, उपशहर संघटक सचिन खंडागळे, उपशहर प्रमुख दिनेश कडू , पंकज पवार, मिथिलेश म्हामुणकर , पंकज शिंदे , प्रज्योत घोसाळकर , नारायण जुनघरे , नारायण सुर्वे, विशाल बैलमारे, तेजस गायकर, स्वप्नील जाधव, संदीप कर्णूक, उदय जाधव तसेच अनेक पदाधिकारी , युवा सेना व शिवसैनिक उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page