Thursday, September 19, 2024
Homeपुणेलोणावळावाढदिवसाचा व्यर्थ खर्च टाळून, राबवीला समाजपयोगी उपक्रम…

वाढदिवसाचा व्यर्थ खर्च टाळून, राबवीला समाजपयोगी उपक्रम…

लोणावळा (प्रतिनिधी): सुप्रसिद्ध बुवा मिसळ चे मालक तसेच लायन्स क्लब लोणावळा डायमंडचे झोन चेअरमन अनिल गायकवाड यांच्या वतीने मुलगी कु.गौरी गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
कु. गौरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अनिल गायकवाड यांच्याकडून लोणावळ्यातील शंकेश्वर हॉस्पिटल साठी 12 लिटरचा वॉटर प्युरिफाइड भेट देवून माणुसकी जोपसण्यात आली. वाढदिवसाचा व्यर्थ खर्च टाळून हा समाजपयोगी उपक्रम राबविण्यात आला आहे. हॉस्पिटल मधील डॉक्टर कर्मचारी तसेच रुग्णांना याचा लाभ व्हावा या हेतूने ही अनोखी भेट देण्यात आली.
यावेळी लोणावळा नगरपरिषदेचे माजी उप नगराध्यक्ष श्रीधर पुजारी, लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन संध्या खंडेलवाल,लायन तसलीम थासरावाला,लायन दाऊत थासरावाला, लायन अनंत पाडाळे,लायन नवीन बसे आणि गायकवाड परिवारातील सदस्य व हॉस्पिटल मधील स्टाफ मोठया संख्येने उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page