Thursday, September 19, 2024
Homeपुणेमावळखांडी गावात सर्पदंश प्रतिबंध व त्यांचे संवर्धन याविषयी जनजागृती कार्यक्रम संपन्न…

खांडी गावात सर्पदंश प्रतिबंध व त्यांचे संवर्धन याविषयी जनजागृती कार्यक्रम संपन्न…

मावळ (प्रतिनिधी):वनपरिक्षेत्र शिरोता वनविभाग पुणे आणि द.काॅर्बेट फाऊंडेशन मुंबई,एच डी एफ सी बॅंक परिवर्तन यांच्या विद्यमाने सर्वांगीण ग्रामीण विकास कार्यक्रम अंतर्गत मौजे खांडी मावळ,येथे विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये मुख्यवनसंरक्षक पुणे प्रविण.एन.आर तसेच उपवनसंरक्षक पुणे महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक वनसंरक्षक मयुर बोठे व वनपरिक्षेत्र अधिकारी शिरोता सुशील मंतावर यांच्या नेतृत्वात ‌द कॉर्बेट फाऊंडेशनच्या वतीने सर्पदंश प्रतिबंध व त्यांच्या अन्नसाखळीतील महत्व आणि त्यांचे संवर्धन या विषयावर क्षेत्र समन्वयक राहुल कांबळे यांनी ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली.तसेच मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी सर्व ग्रामस्थांना 120 बॅटरींचे (टॉर्चचे) वाटप करण्यात आले.
त्यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी शिरोता संस्थेचे सुशील मंतावार,शिरोता संस्थेचे प्रकल्प प्रबंधक श्रीदत्त जाधव, प्रकल्प समन्वयक दिव्यांशू पवार,क्षेत्र समन्वयक चेतन धरणे, प्रशांत कुंभार,आशिष ठोके तसेच वहाणगाव वनपरिमंडळ अधिकारी
सखाराम बुचडे,वनरक्षक लालासाहेब वाघापुरे,खांडी वनरक्षक श्रीमती राणी ढोले आणि संस्थेचे मान्यवर व कर्मचारी यांसह खांडी मधील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
द कॉर्बेट फाऊंडेशन मुंबई,एच डी एफ सी बॅंक परिवर्तन यांच्या सहयोगाने मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी व नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी मावळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये सदर उपक्रम राबविणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी शिरोता सुशील मंतावार यांनी सांगितले.
- Advertisment -

You cannot copy content of this page