Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आरपारच्या लढाईला सुरुवात !

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आरपारच्या लढाईला सुरुवात !

कर्जतमध्ये बंदला सर्व पक्ष व अनेक संघटनांचा उत्स्फूर्त पाठिंबा…

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) ” छत्रपती शिवाजी महाराज की जय , जय भवानी जय शिवाजी , एक मराठा लाख मराठा , आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे , कोण म्हणतो देणार नाय घेतल्याशिवाय राहणार नाय , एकच मिशन मराठा आरक्षण , छत्रपती संभाजी महाराज की जय , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो ” अश्या घणाघाती घोषणाबाजीने कर्जत शहराबरोबरच संपूर्ण तालुका हादरला.
कर्जत तालुक्यात सर्व पक्षीय व अनेक संघटनेच्या माध्यमातून ” सकल मराठा समाजाने ” पुकारलेल्या ” कर्जत बंद ” ला उत्स्फूर्तपणे पाठींबा मिळाल्याने सर्वच बाजारपेठा आज कडकडीत बंद होत्या . कर्जत , कडाव , कशेळे , त्याचप्रमाणे इतर ठिकाणी या बंद चे पडसाद उमटले . जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी येथे झालेल्या लाठी हल्ला व गोळीबार घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यामध्ये उमटत असून सर्वच ठिकाणाहून याबाबत मोर्चे व आंदोलन होत असल्याचे पहावयास मिळत आहे . याच घटनेचा सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी सोमवार दि. ११ सप्टेंबर २०२३ रोजी सकल मराठा समाजाने ” कर्जत बंद ” ची हाक देण्यात आली होती.

” मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील ” मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आपले प्राण पणास लावून १२ दिवस झाले उपोषणाला बसले आहेत . सनदशीर मार्गाने शांततेत हे आंदोलन सुरू असताना येथील उपस्थित असलेल्या नागरिकांवर केलेला हल्ला व गोळीबाराने व सकल मराठा समाजाला आर्थिक व शैक्षणिक आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन पेटले आहे . कर्जत तालुक्यातील सर्व पक्षीय सकल मराठा समाज , वंचित बहुजन आघाडी , आर पी आय , एस आर पी , पँथर सेना , कर्जत विकास आघाडी , आदिवासी संघटना , कर्जत रेल्वे रिक्षा युनियन , त्याचप्रमाणे अनेक संघटना , धार्मिक संघटना , यांनी या बंद मध्ये सहभागी होत पाठींबा दिला होता.

यावेळी कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक येथून पुष्पहार अर्पण करून या ” क्रोध मोर्च्याला सुरुवात झाली . मराठा , बौद्ध , व आदिवासी बांधवांच्या भव्य मोर्चा संपूर्ण बाजारपेठेतून लोकमान्य टिळक चौकात आल्यावर संतप्त सभा झाली . यावेळी अनेकांनी आपली मते व्यक्त केली . याप्रसंगी मनसे चे जितेंद्र पाटील, नगरसेवक हेमंत ठाणगे , वंचित चे दीपक मोरे , धर्मेंद्र मोरे , आरपीआयचे नगरसेवक राहुल डाळींबकर , भाजपा चे किरण ठाकरे , रमेश कदम , सेनेचे प्रदीप ठाकरे , संतोष पाटील , प्रमिला बोराडे ,सुरेश बोराडे , राष्ट्रवादीचे पूजा सुर्वे, भारती कांबळे, प्रकाश पालकर, शंकर थोरवे, शिवसेना शिंदे गटाचे मनोहर दादा थोरवे , संदीप शेठ भोईर , नगरसेवक संकेत भासे , संघटक नदीम भाई खान , शरद हजारे , राष्ट्रवादी पवार साहेब गटाचे माझी नगराध्यक्ष राजेश लाड, नगरसेवक सोमनाथ ठोंबरे, मधुरा चंदन, सुवर्णा निलधे, अशोक शिंदे , राष्ट्रवादी अजित दादा पवार गटाचे स्वप्नील पालकर, ऍड . राजेंद्र निगुडकर, सोमनाथ पालकर , शाहीर गणेश ताम्हाणे, अनिल भोसले, अरुण देशमुख, प्रसाद थोरवे, काशिनाथ शिंदे, रत्नाकर बडेकर , कम्युनिस्ट पक्षाचे गोपाळ शेळके , आदिवासी समाजाचे मालू निरगुडा , भारत मुक्ती मोर्चा चे दिपक भालेराव , त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने मराठा समाज व अनेक संघटना , धार्मिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र घरड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
- Advertisment -

You cannot copy content of this page