Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडशिल्परत्न " पांडुरंग अर्जुन उर्फ जीवन घोडके " यांची जयंती कर्जतमध्ये उत्साहात...

शिल्परत्न ” पांडुरंग अर्जुन उर्फ जीवन घोडके ” यांची जयंती कर्जतमध्ये उत्साहात साजरी !

बाल सुधार गृह कर्जत येथे केले शालेय उपयोगी साहित्य , खाऊ व फळ वाटप..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) ” झोपडीत माझ्या वाकूनी आत आले , मनात खोटे राखुनी आत आले……मी कुणाला का ठरवू दोषी, तयांना ओळखाया मीच ठरलो अपयेशी…..कारण स्वार्थी – कपटी – लोभी नगरीचे , होते ते रहिवाशी ….होते ते रहिवाशी……मी का ठरवू कुणाला दोषी , तयांना ओळखाया मीच ठरलो अपयेशी……” , असे एक ना अनेक अजरामर काव्य लिहून समाजात जनजागृती करणारे कर्जत तालुक्यातील वेणगाव येथील ” शिल्परत्न ” व शिल्पकार साहित्य कला मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रबोधनकार – कलारत्न – साहित्तिक – शिघ्रकवी – सांस्कृतिक – धार्मिक – शैक्षणिक – सामाजिक व राजकीय क्षेत्रातील चमकणारा तारा , ” गुरुवर्य पांडुरंग अर्जुन उर्फ जीवन घोडके ” यांची १ ऑक्टोंबर २०२३ रोजी जयंती मोठ्या उत्साहात घोडके परिवार व शिल्पकार साहित्य कला मंडळाचे पदाधिकारी यांनी साजरी केली.
यावेळी निरिक्षण गृह / बाल गृह – कर्जत येथे विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य ( बॅग ) , खाऊ व फळ तसेच बाल गृहास घड्याळ भेट देण्यात आली. याकामी सौ . प्रेरणा सचिन भालेराव , शिल्पकार साहित्य कला मंडळ व घोडके परिवाराने पुढाकार घेतला.यावेळी विचार पिठावर त्यांच्या सर्व कार्यात सावली सारखी साथ देणारी त्यांची पत्नी सुमन पांडुरंग घोडके , मुलगी सौ. प्रेरणा सचिन भालेराव , सुभाष सोनावणे – पत्रकार , मधुकर रोकडे – भारतीय बौद्ध महासभा केंद्रिय शिक्षक , अशोक दादा सोनावणे – अध्यक्ष शिल्पकार साहित्य कला मंडळ , मोहन धनवटे – सदस्य , कमलाकर जाधव – सदस्य , नरेश जाधव – सदस्य , बाल निरिक्षण गृह / बाल गृहाचे मानद सचिव सुरेश उर्फ भाऊ खानविलकर आदी मान्यवर उपस्थित होते . प्रथम भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सुमन पांडुरंग घोडके यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी भाऊ खानविलकर – मानद सचिव , यांनी बाल गृह कसे चालविले जाते , कोण मदत करत , २७ वर्षे बालगृह कसे चालविले , हे थोडक्यात सांगून जीवन घोडके माझे मित्र होते , त्यांचे कार्य खूप मोठे होते , असे सांगितले , तर मधुकर रोकडे यांनी पांडुरंग उर्फ जीवन घोडके यांचे सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी होती , असे मत व्यक्त केले , तर अशोक दादा सोनावणे यांनी कलाकारांच्या बाबतीत घोडके दादांची तळमळ नेहमीच त्यांच्या कामातून दिसली , कलाकारांसाठी त्यांनी स्थापन केलेला ” शिल्पकार साहित्य कला मंडळाच्या ” माध्यमातून आम्हाला दिलेले काव्य भविष्यात नेहमीच जिवंत असेल , असे भावनिक मत व्यक्त केले.
शिल्पकार साहित्य कला मंडळाचे सदस्य नरेश जाधव यांनी गुरुवर्य जीवन घोडके यांनी सर्व कलाकारांना एकत्र आणून हि संघटना काढून खूप मोठे मोलाचे कार्य केले आहे , त्यांचे विचार , त्यांचे काव्य पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचे काम आम्ही सर्व मिळून करू , असे आश्वासन त्यांनी दिले व गुरुवर्य जीवन घोडके यांचे काव्य त्यांनी गाऊन दाखविले , त्यांची मुलगी सौ. प्रेरणा भालेराव यांनी असे सामाजिक कार्य करत गुरुवर्य जीवन घोडके यांचे नाव व त्यांचे सर्व क्षेत्रातील कार्य सर्वदूर पसरविले आहे , असे मत व्यक्त केले , तर त्यांची मुलगी अश्विनी कांबळे यांनी आपल्या वडिलांचा ” जीवनपट ” उलगडताना म्हणाल्या की , महापुरुषांची जयंती आपण साजरी करत असतो , मात्र आपल्या वडिलांची देखील त्यांनी केलेल्या कार्यामुळे आपल्या हातून त्यांच्या जन्म दिनी दान रुपी वस्तू देवून त्यांनी घडविलेले कलाकार उपस्थित राहून त्यांची जयंती साजरी करतात , याचा आम्हाला आनंद होत आहे , असे आदर पूर्ण मत व्यक्त करताना बाबांनी कलाकारांना उतरत्या काळात वाईट परिस्थितीत शासनाकडून पेन्शन रुपी मानधन मिळावे , यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न , यावर प्रकाश टाकला.
तर त्यांची मोठी मुलगी सौ. प्रेरणा सचिन भालेराव यांनी १ ऑक्टोंबर १९५२ रोजी पांडुरंग घोडके यांचा जन्म झाला , माझ्या वडिलांनी खूपच हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेवून त्यांच्या वडिलांचे छत्र गेल्यावर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कुटुंब सांभाळले , व त्यातूनच महापुरुषांचे चरित्र वाचून सर्वगुण संपन्न होवून कला क्षेत्रा बरोबरच राजकीय – शैक्षणिक – सामाजिक – सांस्कृतिक – धार्मिक क्षेत्रात भरीव कार्य केले . त्यांचे काव्य आजही अजरामर आहे , त्यांनी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक विठ्ठलजी उमप , प्रल्हादजी शिंदे यांच्या बरोबर गायन केले असल्याचे त्यांनी सांगितले , तर बाल गृहातील विद्यार्थ्यांनी सुध्दा चांगले संस्कार घ्या , उच्च शिक्षण घ्या , मानवतावादी बनून दुसर्यांना मदत करा , वडीलधाऱ्या व्यक्तींचा मान ठेवा , तरच भविष्यात तुम्ही प्रगती कराल , असा मोलाचा सल्ला देखील प्रेरणा भालेराव यांनी त्यांचे वडील पांडुरंग घोडके यांच्या जयंती दिनी देवून शिल्पकार साहित्य कला मंडळाला सर्वतो मदत करण्याचे आश्वासन दिले . ” गुरुवर्य पी.ए.घोडके ते जीवन घोडके ” हा त्यांचा प्रवास किती संघर्षमय होता , यावर देखील प्रेरणा भालेराव यांनी प्रकाश टाकला.

यावेळी जीवन घोडके यांच्या जयंती कार्यक्रम निम्मित शालेय साहित्य – खाऊ – फळ वाटप कार्यक्रमास पत्नी सुमन घोडके , बहिण भीमाबाई जानू सकपाळ , मुलगी प्रेरणा भालेराव , मुलगा अभिनय घोडके , मुलगी अश्विनी कांबळे , मुलगी प्रगती सुर्वे , मुलगा प्रणित घोडके , सून विद्या घोडके , जागृती घोडके , जावई सचिन भालेराव , लूकेश प्रभाकर सुर्वे , प्रतिमा सिद्धार्थ गायकवाड तसेच नातवंडे – प्रद्युम्न , सुधांशू , शास्वत , प्रांजली , शास्वती , राज , गार्गी , हर्षु , यश , आयरया तर जिल्हा परिविक्षा अनुरक्षण संघटना संचालित मुलांचे निरिक्षण गृह / बाल गृह – कर्जतचे हेमंत खंडवी – परिविक्षा अधिकारी , भाऊ खानविलकर – मानद सचिव , सुरेश वाळंज – समुपदेशक , सागर मार्के – मदतनीस , लीला निगुडसे – स्वयंपाकी आदी कर्मचारी उपस्थित होते .यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद दिसत होता.
- Advertisment -

You cannot copy content of this page