Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमध्ये "श्री लक्ष्मीनारायण आणि नवग्रह शांती यज्ञ " होणार संपन्न !

कर्जतमध्ये “श्री लक्ष्मीनारायण आणि नवग्रह शांती यज्ञ ” होणार संपन्न !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत नगर परिषद हद्दीतील शनी मंदिर , महावीर पेठ परिसरात असणाऱ्या राधाकृष्ण घाटा जवळील श्री राधाकृष्ण व मारुती मंदिर सेवा संस्थान तसेच श्री राधाकृष्ण गोशाळा संस्थानच्या वतीने दुसऱ्या वर्षी ” श्री लक्ष्मीनारायण व नवग्रह शांती यज्ञ ” उत्सव शारदीय नवरात्रोत्सव मुहूर्तावर दि . १६ ऑक्टोंबर २०२३ रोजी शुभारंभ होत असून याप्रसंगी ११ वाजता ” कलश यात्रा ” श्री राधा कृष्ण मंदिर पासून श्री कपालेश्वर मंदिर व पुन्हा श्री राधाकृष्ण मंदिर येथे येऊन कलश मंडप प्रवेश , वैदिपूजन , ब्राह्मण पूजन , आरती व प्रसाद असा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे . तरी सुख, समृद्धी, शांती यासाठी या उत्सवात सर्वांनी सहभागी होण्याचे आमंत्रण , श्री राधाकृष्ण आणि मारुती मंदिर सेवा संस्थान व श्री राधाकृष्ण गोशाळा संस्था यांच्या वतीने तमाम कर्जतकर नागरिकांना देण्यात आले आहे.

शारदीय नवरात्री (यज्ञ) दुसऱ्या वर्षी होणार आहे. कर्जतमध्ये दिनांक १६ ऑक्टोंबर ते २२ ऑक्टोंबर २०२३ पर्यंत या पवित्र दिवशी खालील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . कार्यक्रमाचा शुभारंभ दिन सोमवार दिनांक १६ ऑक्टोंबर पासून सुरू होणार असून संध्या. ४ ते ७ वाजता वेदी पूजन , ब्राह्मण पूजा, नवग्रह पूजा, लक्ष्मीनारायण हवन, आरती आणि प्रसाद , मंगळवार दि . १७ ऑक्टोंबर संध्या. ४ ते ७ वेदीची पूजा, ब्राह्मण पूजा, नवग्रह पूजा, लक्ष्मीनारायण हवन, आरती आणि प्रसाद , बुधवार दि.१८ ऑक्टोंबर संध्या . ४ ते ७ वेदीची पूजा, ब्राह्मण पूजा, नवग्रह पूजा, लक्ष्मीनारायण हवन, आरती आणि प्रसाद , गुरुवार दि. १९ ऑक्टोंबर संध्या. ४ ते ७ वेदीची पूजा, ब्राह्मण पूजा, नवग्रह पूजा, लक्ष्मीनारायण हवन, आरती आणि प्रसाद , शुक्रवार दि. २० ऑक्टोंबर संध्या. ४ ते ७ वेदीची पूजा, ब्राह्मण पूजा, नवग्रह पूजा , लक्ष्मीनारायण हवन, आरती व प्रसाद , शनिवार दि. २१ ऑक्टोंबर संध्या. ४ ते ७ वेदीची पूजा, ब्राह्मण पूजा, नवग्रह पूजा, लक्ष्मीनारायण हवन, आरती आणि प्रसाद , तर रविवार दि. २२ ऑक्टोंबर २०२३ रोजी दुपारी ४ ते ७ वेदीहवन, नवग्रह फल हवन, गुगल हवन, पिलीराई हवन, कमलबीज हवन, त्याग पूर्णाहुती, आरती कन्यापूजन आणि प्रसाद असा भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून , सर्व भाविकांनी वरील कार्यक्रमास उपस्थित रहावे व या महायज्ञात जास्तीत जास्त भाविकांनी तन, मन, धनाने सहभागी होऊन यज्ञ यशस्वी करावा , असे आवाहन श्री राधाकृष्ण व मारुती मंदिर सेवा संस्थान, महावीर पेठ, राधाकृष्ण घाट, कर्जत, जि. रायगड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

होम यज्ञासाठी मंदिरातील पंडित श्रीमान गयाप्रसाद पांडे – 7498540252 / 9869210002 / 8081710824 यांच्याशी संपर्क साधावा तसेच सर्व भाविकांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन अध्यक्ष – शिव किशोर शिवनारायण गुप्ता , उमाशंकर गयादिन गुप्ता – उपाध्यक्ष , शिवलाल बाबूलाल गुप्ता – सचिव , शिवसेवक मोतीलाल गुप्ता – खजिनदार , रामकुमार हनुमान गुप्ता – खजिनदार , सदस्य – सुरज हरिशंकर गुप्ता , कौशल किशोर जागेश्वर मिश्रा , रामकुमार हनुमान गुप्ता , श्यामलाल कृष्णकुमार गुप्ता , सतीश दयाशंकर गुप्ता , राजेंद्र फुलचंद्र पांडे , मुकेश राजाराम पाटील , प्रशांत दुर्गाप्रसाद परदेशी , सुरेश वामन देशमुख , श्यामकुमार कृष्णकुमार परदेशी , या कमिटीने केले आहे . या शारदीय नवरात्री उत्सव यज्ञास कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. सुवर्णा जोशी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page