Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर चार दुकाने फोडली..

कर्जत पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर चार दुकाने फोडली..

चोर मचाये शोर…कर्जतमध्ये चोरांनी मारला डल्ला !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत कर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या अनेक त्रुटी कर्जत शहरात असल्याने कर्जत पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी नेहमीच हतबल असल्याचेच दिसतात . नेमका याचाच फायदा ही ” चोर कंपनी ” घेत असून कर्जत शहरात चोरांनी गेल्या ३ महिन्यांपासून हैदौस घातला आहे . गेल्यावेळी ” नानामास्तर नगर ” परिसरात चोरांनी चोरी करून त्या परिसरात नागरिकांची झोप उडवली असताना आता तर त्यांनी कर्जत पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या हिरा – पन्ना या इमारतीत चार गाळे फोडून व जुने एस.टी.स्टँड परिसरात चोरी केल्याचे दिसून येत आहे . विशेष म्हणजे या दुकानाच्या समोरच उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे कार्यालय आहे.

चोरी झाल्यानंतर चोर पकडण्या पेक्षा चोरी होणारच नाही , अशी यंत्रणा या आधुनिक आणि तंत्रज्ञान युगात पोलीस खात्याकडे असणे गरजेचे असताना त्याची वानवा कर्जत शहरात नेहमीच भासत आहे . आता तर हे चोर दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा असताना देखील घाबरत नसून बिंनदिक्कित दुकानाच्या गाळ्यांचे शटर तोडून आत प्रवेश करून पैशांवर डल्ले मारत आहेत . कर्जत शहरात व महावीर पेठेत सोन्या चांदीचे दुकाने असल्याने या अश्या चोरी होण्याच्या प्रकाराने पेढी व्यापाऱ्यांनी चोरांचा धसका घेतला आहे.

गेल्या वीस वर्षांपासून पोलीस दलांची संख्या कर्जत पोलीस ठाण्यात कमी आहे , मुख्य बाजारपेठ व रेल्वे स्थानकाच्या बाहेरचं असलेली पोलीस चौकी गेली १० ते १५ वर्षे बंद आहे . मुख्य भागातील रस्त्यांवर असलेल्या चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत , रात्रीच्या गस्त घालने हे कुठे दिसत नाहीत , प्रभागातील तरुण मंडळ यांना हाताशी धरून आपआपल्या परिसरात गस्त घालण्यासाठी पोलीस ठाण्याने पुढाकार घेतला जात नाही , याबाबत जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक यांच्याकडून नागरिकांच्या सुरक्षितता बाबत कुठल्याच सूचना होत नाहीत , या त्रुटी मुळेच चोरांचे फावत असून ” चोर मचाये शोर् ” यासारख्या घटना कर्जत शहरात होत असून , पोलीस स्टेशनला आव्हान देणाऱ्या या चोरीमुळे पोलीस दल देखील हादरून गेले असून या चोरांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी कर्जतकर नागरिक , व्यापारी वर्ग करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page