Saturday, August 2, 2025
Homeपुणेलोणावळाधरणात बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात चार ते पाच तासांच्या अथक...

धरणात बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात चार ते पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर शिवदुर्गं टीमला यश…

लोणावळा (प्रतिनिधी):आज दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान लोणावळा धरणात बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह शोधण्यात शिवदुर्ग मित्र रेस्क्यु पथकाला यश आले आहे. पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास दोन्ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत.
विवेक छत्री ( वय 21, रा. ओळकाईवाडी), करण कुंवर (वय 20, या. ओळकाईवाडी) अशी या पाण्यात बुडून मयत झालेल्या मुलांची नावे आहेत.
धरणात मुले बुडाल्याची माहिती समजताच शिवदुर्ग चे अजय शेलार, महेश म्हसणे, सागर कुंभार, मनोहर ढाकोळ, राजेंद्र कडू, प्रणय अंबुरे, अनिल आंद्रे, चंद्रकांत बोंबले, अमोल परचंड, अनिकेत आंबेकर, अमोल सुतार, दक्ष काटकर, आयुष वर्तक, दुर्वेश साठे, महादेव भवर, रतन सिंह, अशोक उंबरे, सुनील गायकवाड, ब्रिजेश ठाकुर, मयुर दळवी, साहिल भिकोले, निहाल दळवी, आकाश घरदाळे, कैलास दाभणे, दिपाशु तिवारी यांच्या पथकाने टाटा धरणाच्या मुले बुडल्याच्या ठिकाणी जाऊन पाण्यात तात्काळ शोध मोहीम राबवत मुलांना बाहेर काढले. मात्र नाका तोंडात पाणी गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजतात लोणावळा शहर चे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल व पोलीस पथक देखील घटना स्थळी दाखल झाले होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page