Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमध्ये अशोका विजया दशमी व धम्म चक्र प्रवर्तन दिन , मोठ्या उत्साहात...

कर्जतमध्ये अशोका विजया दशमी व धम्म चक्र प्रवर्तन दिन , मोठ्या उत्साहात साजरा !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या महापरिनिर्वान नंतर ” स्थिरावलेले धम्म चक्र ” सम्राट अशोका यांनी पुन्हा परिवर्तित करून कलिंग युद्धाच्या दहाव्या दिवशी बुद्ध धम्माची दिक्षा घेतली अश्या ” सम्राट अशोका विजया दशमीच्या ” व अडीच हजार वर्षानंतर ” थोर महापुरुष डॉ . बाबासाहेब आंबेडकर ” यांनी याच दिवशी दसरा दिनी १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी ” रक्ताचा एक ही थेंब न सांडवता नागपूर येथे बुद्ध धम्माची लाखो अनुयायी सोबत दिक्षा घेवून स्थिरावलेले धम्म चक्र पुन्हा एकदा परिवर्तित करून गतिमान केले , व धम्म क्रांती घडविली ” अश्या या ” सम्राट अशोका विजया दशमी व धम्म चक्र प्रवर्तन दिन कर्जतमध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम भाई जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी कर्जत शहरातील ” भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर ” यांच्या स्मारकास उत्तमभाई जाधव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व सर्वांनी महापुरुषांचा जयघोष केला . यावेळी एस आर पी चे जिल्हाध्यक्ष उत्तम भाई जाधव व कर्जत ता. अध्यक्ष प्रभाकर दादा गोतारणे यांनी सर्व बहुजनांना व भारतीयांना आजच्या या पवित्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम भाई जाधव , कर्जत ता. अध्यक्ष प्रभाकर दादा गोतारणे , उपाध्यक्ष चंद्रकांत धनवटे , महासचिव प्रकाश जाधव , विजय जाधव , राजुभाऊ मोरे , विजय जाधव , एस आर पी कर्जत शहर अध्यक्ष सुभाष सोनावणे , राहुल धनवटे , सतिश रिकिबे , त्याचप्रमाणे इतर कार्यकर्ते व बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page