Thursday, November 21, 2024
Homeपुणेमावळमराठा समाजाला आरक्षण मिळत नाही या नैराशातून आळंदी येथे साठ वर्षीय जेष्ठाची...

मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही या नैराशातून आळंदी येथे साठ वर्षीय जेष्ठाची आत्महत्या…

मावळ (प्रतिनिधी):मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आणि मुलाला अनुकंपावर नोकरी मिळेना. या नैराश्यातून 60 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याचा प्रकार आळंदी येथील जुन्या बंधाऱ्यात घडला आहे.व्यंकट ढोपरे (वय 60)असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
व्यंकट ढोपरे हे सध्या पुणे जिल्ह्यातील नरे आंबेगांव येथे वास्तव्यास होते. ते मूळचे लातूर जिल्ह्यातील उंबरदरा गावचे. ते तेथील माजी सरपंच होते.
व्यंकट ढोपरे यांनी वृद्धापकाळात टोकाचे पाऊल उचललं आहे. पुण्याच्या आळंदीमधील इंद्रायणी नदीत त्यांचा आज मृतदेह आढळला. नऱ्हे आंबेगाव येथून काल ते दर्शनासाठी आळंदीत आले होते. सकाळी अकराच्या सुमारास ते तिथून निघाले. त्यांच्या कुटुंबियांना घरातच एक चिट्टी सापडली. त्यातून त्यांनी आरक्षण मिळत नसल्याने टोकाच पाऊल उचलल्याचं स्पष्ट झालं आहे.
रात्री 8 च्या दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन दलास पाचारण करण्यात आले.व शोध मोहीम सुरू झाली. जुन्या बंधाऱ्याच्या नदी पात्रात आळंदी नगरपरिषदेच्या आग्निशमन दल, पिंपरी चिंचवड अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापना मार्फत बोटीच्या सहाय्याने काल (दि.27) रात्री उशिरा पर्यंत त्यांची शोध मोहीम सुरू होती.
आज (दि.28) सकाळी पुन्हा एकदा बंधाऱ्यात शोध मोहिमेचे काम सुरू झाले. आज दुपारी एक-सव्वा एकच्या दरम्यान जुन्या बंधाऱ्याच्या पाण्यात त्यांचा हात बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. स्वतः चे हात बांधून त्यांनी बंधाऱ्यात आत्महत्या केल्याचा
अंदाज आहे.
त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहले आहे, की मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. मी सरपंच असल्यापासून प्रयत्न करतो. तरी सरकार याला गांभीर्याने घेत नाही. तसेच 2012 पासून माझ्या मुलाला अनुकंपावर नोकरी दिली जात नाही. मुलाच्या आईच्या वडिलांच्या जागी त्याला नोकरी मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. पण प्रशासन आम्हाला न्याय देत नाहीत. याच नैराश्यातून मी आत्महत्या करीत आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page