Saturday, August 2, 2025
Homeपुणेलोणावळादेवघर येथील आदर्श क्लासेसचा द्वि-दशकीय 2023 पूर्ती सोहळा...

देवघर येथील आदर्श क्लासेसचा द्वि-दशकीय 2023 पूर्ती सोहळा उत्सहात संपन्न…

लोणावळा (प्रतिनिधी): देवघर येथील आदर्श क्लासेस द्वि-दशक सोहळा दि.4 नोव्हेंबर रोजी वाकसई फाटा येथील एका रिसॉर्ट मध्ये उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी शेकडो आजी माजी विध्यार्थ्यांनी उपस्थिती दाखवली.यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुखस्थानी तळेगाव नगरीतील उद्योजक ऍड.सुरेश सातकर,वामनराव हैबतराव विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. बी.पाटील, उद्योजक मारुती तांदळे,आदर्श क्लासेसचे संस्थापक हरिविजय देशमुख,संचालिका नम्रता देशमुख,माजी सरपंच महादू बहिरू देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदर्श क्लासेसच्या गुणवंत विध्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकलव्य फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी केले आदर्श क्लासेसची उज्वल वीस वर्षाची परंपरा सांगताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. देवघर गावात 2003 पासून आदर्श क्लासेस सुरू करुन स्थानिक विद्यार्थ्याना उत्तम मार्गदर्शनाची सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्यार्थ्यानी हरिविजय देशमुख व ऍड.सुरेश सातकर सर यांचे आभार मानले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बी.बी.पाटील यांनी सांगीतले स्वतःच्या अंतरंगात असलेल्या नविण्याचा शोध घेणे गरजेचे आहे, ते नाविन्य हरिविजय देशमुख सरांना 20 वर्षापुर्वी सापडले.त्याचा सलग ध्यास घेऊन सातत्याने गणित सारखा अवघड विषय सोपा करुन शिकवला त्यामूळे अनेकांचे जीवन फुलले.तसा आपल्या अंतर मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर निश्चित जीवन मार्ग मोकळा होइल असे पाटील सर बोलले.
सातकर सरांनी विद्यार्थ्याना आर्थिक साक्षर होण्यासाठी काय करावे या विषयी मार्गदर्शन केले.जीवनात संगतीचे महत्व विषद करताना आपली संगत चांगल्या लोकांशी असणे आवश्यक असल्याचे सांगितले.यश मिळवण्यासाठी सतत प्रयत्न आवश्यक आहेत.ते अनेक उदाहरणे देऊन पटवून दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश इंगुळकर सर यांनी केले तर उपस्थीत मान्यवरांचे आभार हरिविजय देशमुख यांनी मानले.यावेळी उपस्थित मान्यवर व विध्यार्थ्यांसाठी जेवणाची उत्तम व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली होती.
- Advertisment -

You cannot copy content of this page