Sunday, August 3, 2025
Homeपुणेलोणावळामहाराष्ट्र रिक्षा टॅक्सी पंचायत मावळ तालुका व लोणावळा शहर महिला अध्यक्षपदी अविशा...

महाराष्ट्र रिक्षा टॅक्सी पंचायत मावळ तालुका व लोणावळा शहर महिला अध्यक्षपदी अविशा जाधव यांची नियुक्ती…

लोणावळा (प्रतिनिधी):महाराष्ट्र रिक्षा टॅक्सी पंचायत मावळ तालुका तसेच लोणावळा शहर महिला अध्यक्ष पदी मावळातील प्रथम महिला रिक्षा चालक अविशा धम्मरक्षित जाधव यांची निवड करण्यात आली.
महाराष्ट्र रिक्षा पंचायत ऑटो टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती व ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रानंतर आज लोणावळा शहरात दौरा झाला. यावेळी ही नियुक्ती करण्यात आली.
यावेळी ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, महाराष्ट्र रिक्षा पंचायत प्रदेश उपाध्यक्ष बाबुभाई शेख, लोणावळा शहर अध्यक्ष आनंद सदावर्ते, प्रदेश संघटक अब्बास खान,शिवसेना वाहतूक विभागाचे अध्यक्ष महेश केदारी, लोणावळा खंडाळा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष अमोल शेडगे , उपाध्यक्ष फिरोज बंगाली ,वाहतूक आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष पंकज खोले ,मनसे वाहतूक आघाडी उपाध्यक्ष संदीप पोटफोडे,टपरी पथारी हातगाडी पंचायत महिला अध्यक्ष लक्ष्मी सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन विनय बच्चे, भगवान घनवट, विकास खेंगरे, रवींद्र ताकधोंदे, चंद्रकांत बालगुडे, वसीम खान सत्तार शेख, संजय डेंगळे, प्रकाश मातेरे, दत्ता दळवी, राजेंद्र जाधव, सूर्यकांत धकोल, मंगेश खराडे, प्रकाश लोखंडे, दिनेश गवळी, चंद्रशेखर उमटे,विजय ठाकर यांनी केले.
यावेळी बोलताना बाबा कांबळे म्हणाले,रिक्षा चालकांचे प्रश्न अत्यंत गंभीर होत असून रिक्षा चालकांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. मुक्त परमिट धोरणामुळे त्यांचा व्यवसाय पूर्ण संपत आला आहे. यात टॅक्सी चालकांचे देखील असेच प्रश्न असून ओला उबर या भांडवलदार कंपन्यामुळे तसेच टू व्हीलर या सोप्या वाहतुकीमुळे रिक्षा व टॅक्सी हे दोन्ही व्यवसाय अडचणी मध्ये आले आहेत.
आता टॅक्सी आणि रिक्षाने हातात हात घालून काम करण्याची आवश्यकता आहे. 1 डिसेंबर 2023 रोजी पिंपरी चिंचवड पुणे येथे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.हे अधिवेशन यशस्वी करून आपली ताकद दाखवूनद्या असे आवाहन यावेळी बाबा कांबळे यांनी केले. महेश केदारी, बाबूभाई शेख यांनी यावेळी मनोगते व्यक्त केला.कार्यक्रमाचे प्रस्ताविक लोणावळा शहर अध्यक्ष आनंद सदावर्ते यांनी केले तर आभार अब्बास खान यांनी मानले.
- Advertisment -

You cannot copy content of this page