Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" राजाभाऊ कोठारी क्लासेस " च्या वतीने कर्जत तालुक्यात आदिवासी बांधवांना दिवाळी...

” राजाभाऊ कोठारी क्लासेस ” च्या वतीने कर्जत तालुक्यात आदिवासी बांधवांना दिवाळी फराळ वाटप !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) ” दिवाळी सण मोठा , नाही आनंदाला तोटा , अश्या या दिवाळी सणात दीपोत्सवाला खूपच महत्त्व असते . ” ज्ञानाचा दिवा ” सर्वत्र लावून विद्यार्थी घडविण्याचे काम अहोरात्र करून , रक्तदान शिबिर भरविण्यात ज्यांचे नाव कर्जतच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिले जाते , असे सार्वजनिक रक्तदाते तथा रायगड भूषण राजाभाऊ कोठारी सर यांच्या वतीने कोठारी क्लासेस च्या टी. वाय. बी. कॉम. २०१७ च्या बॅच दरवर्षी लक्ष्मी पुजनच्या मुहूर्तावर आदिवासी वाड्यात जाऊन दिवाळी फराळाचे वाटप करण्यात येते.

जशी आपली दिवाळी तशीच आदिवासी बांधवांच्या घरातही चिल्या – पिल्यांच्या मुखी गोड धोड गेले पाहिजे , असा उद्दात हेतू डोळ्यासमोर ठेवून आपण हि या समाजाचे काही देणे आहोत म्हणूनच गेली ७ वर्षे आदिवासी वाड्या पाड्यात जाऊन फराळ वाटपाचे हे अविरत कार्य राजाभाऊ कोठारी सर् व त्यांचे विद्यार्थी करत असतात . यंदा फराळ वाटपाचे हे ७ वे वर्ष असून , या वर्षी रविवार दि. १२ नोव्हेंबर २०२३ रोजी साळोख व नांगुर्ले या दोन आदिवासी वाडीत २०० कुटुंबांना दिवाळी फराळाचे व उटणे पाकिटाचे वाटप करण्यात आले , व सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रसंगी राजाभाऊ कोठारी क्लासेसचे सर्वेसर्वा राजाभाऊ कोठारी सर , डॉ. प्रशांत सदावर्ते , संजीव ठाकरे , अशोक शेडगे , रूपेश ठाकरे , वैभव जगताप , शुभम कदम , मितेश डागा , अंकित सोनावणे , संकेत हार्णे , सौरभ देशमुख , मिलिंद कनोजिया , अभिजित जंगम , राणी लोवंशी , पुष्पा वर्मा , जसोदा देवडा , तन्वी शिंदे , अण्णा पवार व इतर विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते . यावेळी अनेक आदिवासी बांधव उपस्थित राहून त्यांना दिवाळी फराळ व उटणे वाटप करण्यात आले.
- Advertisment -

You cannot copy content of this page