Friday, October 18, 2024
Homeपुणेलोणावळाडॉ.बी.एन.पुरंदरे बहुविध विद्यालयाचा माजी विध्यार्थी महामेळावा संपन्न..

डॉ.बी.एन.पुरंदरे बहुविध विद्यालयाचा माजी विध्यार्थी महामेळावा संपन्न..

लोणावळा(प्रतिनिधी):डॉ .बी.एन. पुरंदरे बहुविध विद्यालयाचा माजी विद्यार्थांचा महामेळावा दि.19/11/2023 रोजी विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला.यावेळी डॉ.बी.एन.पुरंदरे विद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थी, माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या महामेळाव्यात सहभागी झाले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.
मनोगत व्यक्त करताना सुमारे तेवीस वर्षे मुख्याध्यापक म्हणून काम करून सेवानिवृत्त झालेले गुरूवर्य दिनानाथ सिताराम पाटीलसर भाषणात म्हणाले,”मी या शाळेत रूजू झाल्यानंतर अनेक विद्यार्थी येथे शिकले, मोठ्या उच्च पदावर गेले. मला आभिमान वाटतो, की या विद्यालयाचे अनेक विद्यार्थी भारताच्या भूदल, वायूदल व नौदलामधे देशाची सेवा करत आहेत तसेच वकील डॉक्टर आणि न्यायाधीश अशा विविध क्षेत्रात दैदिप्यमान यश मिळवले त्याचा मला सार्थ अभिमान असून माझ्या जीवनाचे सार्थक झाले,असे डॉ .बी.एन.पुरंदरे विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक दी.सी.पाटील सर यांनी आपल्या मनोगतात म्हटले.यावेळी माजी विद्यार्थी, यांची मनोगते झाल्यावर गुरूपुजन झाले.विविध माजी विध्यार्थ्यांच्या हस्ते सर्व सेवानिवृत्त शिक्षक,व शिक्षकेतर कर्मचारी यांना स्मृतिचिन्ह देवून त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.तर विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक दी. सी. पाटील यांचा सत्कार माजी विध्यार्थी व प्रसिद्ध डॉ. सुनील जाधव आणि मराठी सेने दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्या हस्ते करण्यात आला.
महामेळाव्यात सन 1960 ते 2023 चे सुमारे शेकडो माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी शाळेतील आठवणीमधे रमले,सर्वांनी गप्पागोष्टी करत एकञ स्नेहभोजन, ग्रूप फोटोग्राफी, चहापान केले आणि भारत व ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनल मँचचाही सर्वांनी मोठ्या स्क्रीनवर मनमुराद आनंद घेतला.
यावेळी मंचावर सेवानिवृत्त मुख्याध्यापक पुंडेसर, कुलकर्णी सर,वामन वाघुलेसर,पाटकरबाई, चिञकला शिक्षक हिरेसर, सेवानिवृत्त लिपिक कडूसर, जाधवसर, ग्रंथपाल कडू मॅडम, शिपाई गायकवाड,आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक आनंद गावडे सर यांनी केले तर सूत्रसंचालन मनिषा जांभळे व शिल्पा पानसे यांनी केले. सरस्वती स्तवन व राष्ट्रगीत माजी विद्यार्थीनी शिल्पा कोपरकर यांनी गायले.माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी आशिष मेहता यांनी आभार मानले.
- Advertisment -

You cannot copy content of this page