Thursday, September 19, 2024
Homeपुणेलोणावळाविजय जोरी यांची सहाय्यक जिल्हा आयुक्त (स्काऊट) पदी पूनर्नीयुक्ती…

विजय जोरी यांची सहाय्यक जिल्हा आयुक्त (स्काऊट) पदी पूनर्नीयुक्ती…

लोणावळा (प्रतिनिधी): व्हीपीएस हायस्कूल चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक मा. श्री. विजय जोरी यांची पुणे भारत स्काऊट गाईड, जिल्हा संस्थेत ‘सहाय्यक जिल्हा आयुक्त (स्काऊट)’ या पदावर पुनर्नियुक्ती करण्यात आली.
हिमालय वुड बॅज आणि राज्यस्तरीय उत्कृष्ट स्काऊटर पुरस्कार प्राप्त जोरी सर 2008 पासून या पदावर कार्यरत असून, मधल्या काही काळात ट्रेनिंग कौन्सेलर पदाचीही जबाबदारी सांभाळली आहे.
शुक्रवार दि.24 नोव्हेंबर रोजी स्काऊट गाईड राज्यपुरस्कार चाचणी पूर्वतयारी मेळावा समारोपप्रसंगी जिल्हा संघटन आयुक्त मा. दिगंबर कारंडे यांनी नियुक्तीची घोषणा करीत अधिकृत नियुक्ती पत्र सुपूर्त केले.
याप्रसंगी जिल्हा संघटन आयुक्त (गाईड) मा. उषा हिवराळे, ज्ञानसागर गुरुकुल बारामती चे अध्यक्ष मा. सागर आटोळे, जेष्ठ पत्रकार मा. मिलिंद संधान, मा. कार्यकारिणी सदस्य मिलन जाधव, परीक्षक श्री. कृष्णा तामकर व श्री. संजय खरमारे उपस्थित होते.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्रा. जोरी यांनी जिल्हा मुख्य आयुक्त मा. शिक्षणाधिकारी तसेच जिल्हा संघटक आणि कार्यकारिणीला धन्यवाद दिले, पूर्वतयारी मेळाव्यासाठी उपस्थित सुमारे दोनशे स्काऊट गाईड यांना मार्गदर्शन करीत शुभेच्छा दिल्या.या नियुक्तीबद्दल अभिनंदन आणि कार्यकालासाठी शुभेच्छा.
- Advertisment -

You cannot copy content of this page