![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
लोणावळा प्रतिनिधी : वरसोली येथील कचरा डेपोमुळे, स्थानिक ग्रामस्थांना दुर्गंधी आणि धुराचा सामना करावा लागत आहे.यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.तसेच भूगर्भातील पाणीही दूषित होऊ लागले असल्यामुळे या कचरा डेपोतील दुर्गंधी कमी करण्याबाबत लोणावळा नगरपरिषदेणे कायमस्वरूपी उपाय योजना कराव्यात, अन्यथा कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येईल,असा इशारा वरसोली ग्रामस्थांनी लोणावळा नगरपरिषदेला दिला आहे.
लोणावळा शहराबरोबरच आजूबाजूच्या परिसरातही लोकवस्ती मोठ्या संख्येने वाढत आहे. या भागातील शेकडो टन कचरा वरसोली मधील कचरा डेपोत आणून टाकला जातो, या कचरा डेपो परिसरात एक अभियांत्रिकी महाविद्यालय,हॉटेल्स,मनशक्ती प्रयोग केंद्र,रामानंद शास्त्री वृद्धाश्रम,जयानंद धाम धार्मिक क्षेत्र,विविध पर्यटन केंद्रे आहेत.
वरसोली ग्रामस्थां खेरीज, नगर परिषद हद्दीतील वलवण, वाकसई चाळ,वाकसई,देवघर व सदापूर परिसरातील नागरिकांना देखील डेपोच्या दुर्गंधीचा त्रास जाणवत आहे. वरसोली ग्रामपंचायतीकडे ग्रामस्थांच्या तक्रारी येत असून त्यांच्याकडून वेळोवेळी कचरा डेपोच्या दुर्गंधीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे.यावर तात्पुरते इलाज करण्यात येतात.मात्र अद्यापही कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. काही वेळेस कर्मचाऱ्यांच्यावतीने जाणीवपूर्वक कचरा पेटविण्यात येण्याचे प्रकारही घडत आहेत.
त्यामुळे हवेच्या प्रदुषणात भर पडत आहे. त्याने ग्रामस्थांमध्ये श्वसनाच्या विकारांबरोबर आरोग्याची समस्या निर्माण होत आहे. कचरा डेपोतील दुर्गंधी कमी करण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी वरसोली ग्रामस्थांकडून केली जात आहे, याबाबतचे निवेदन लोणावळा नगरपरिषदेचे प्रशासक व मुख्याधिकारी अशोक साबळे व अधिकारी यांना वरसोलीचे सरपंच संजय खांडेभराड,सदस्य अरविंद बालगुडे,सदस्य नामदेव पाटेकर,सदस्य राहुल सुतार, ग्रामसेवक दीपक शिरसाट यांच्यावतीने देण्यात आले असून लोणावळा नगरपरिषद यावर कायमस्वरूपी तोडगा काढणार का याकडे सर्व परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले आहे.