if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) ” होवू दे तुझ्यातील सुरेश लाड जागा……” या कवितेतील काव्यानुसार कर्जत खालापूर मतदार संघाचे माजी आमदार सुरेश भाऊ लाड खरोखरच जागे झाले असून , राजकीय पटलावर त्यांच्या डोक्यावरून इतके पाणी जाऊन हि कुणावरही राग रुसवा नसल्याचे सांगून मी आजपर्यंत ३ वेळा या मतदार संघाचे विधानसभा आमदार म्हणून केलेले कार्य माझ्याच पक्षातील नेते – कार्यकर्ते कुणालाही न सांगता केलेल्या आरोपांचे खंडन करत नसतील , व माझ्यावरच ” वैचारिक हल्ला ” करत असतील तर हे ” शल्य ” मला सहन करण्याच्या पलीकडे असून , आज फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना एकमेकांवर टीका करत असताना आपल्याला येथे न्याय मिळू शकत नाही , म्हणूनच माझ्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत न्याय मिळावा , त्यांची विकास कामे व्हावीत म्हणून “भाजपात” जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रांजळ मत कर्जत खालापूर मतदार संघाचे ” माजी आमदार सुरेशभाऊ लाड ” यांनी आज दिनांक २९ डिसेंबर २०२३ रोजी भारतीय जनता पक्षात नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश केल्यानंतर कर्जतमध्ये प्रथमच पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी या पत्रकार परिषदेस माजी सभापती तानाजी चव्हाण , माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक शरद भाऊ लाड हे उपस्थित होते . यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना ते पुढे म्हणाले की , २ वर्षापूर्वीच मी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता , अजित दादांच्या नवीन पक्षात बहुसंख्य कार्यकर्ते गेले , पवार साहेबांना मानणारा जो वर्ग आहे त्यांना बरोबर घेवुन आम्ही सर्वांनी मिळून भाजपात जाण्याचा हा निर्णय घेतला आहे . माझ्याबरोबर येण्यासाठी मी कुणावरही दबाव टाकत नसून मात्र सर्वांना संपर्कात घेवून भविष्यात भाजपा चे मताधिक्य वाढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मी पाच वेळा विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे गेलो , त्यात ३ वेळा निवडून आलो . हे सांगत आज ” सर्वधर्म समभाव ” असे विचार घेवूनच आम्ही भाजपात गेलो , मात्र विभिन्न पक्ष एकत्र येवून सरकार स्थापन होत आहे , हि परिस्थिती असताना यापूर्वी आघाडीचे जे तत्व होते ते डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही काम करत होतो , व आता हि भाजप पक्ष प्रमुखांची जी धोरणे असतील ती मान्य असतील , त्यांना छेद करू शकत नाहीत , यावर त्यांनी प्रकाश टाकला . आजी – माजी आमदारांच्या मध्ये तु तु – मैं मैं असे कधी झाले नाही , एकमेकांच्या विरोधात आम्ही लढलो मात्र महायुतीत सामील असल्याने भविष्यात वरिष्ठ पातळीवर जे निर्णय होतील त्यानुसार आम्ही एकत्र ही असू शकतो , असे परखड मत माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांनी व्यक्त केले.
माझा भाजप पक्ष प्रवेश बिना मागणी – अटी शर्ती न करताच झाला असून कर्जतमध्ये अजित दादा चिंतन शिबिरास आले , मुख्यमंत्री लोकार्पण सोहळ्यास येणार आहेत , मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना येथे आणायचे , असे कुठलेच कारण नाही ,यावर देखील त्यांनी खुलासा केला व भविष्यात महायुतीचे काम करत राहून भाजप पक्ष वाढविण्यास कटिबध्द आहे . लोकसभा – विधानसभा निवडणूकीत पक्ष जो उमेदवार देईल त्यासाठी काम करणार , मात्र सर्व पक्ष स्वतंत्र निवडणुकीस सामोरे गेल्यास भाजपाने उमेदवारी दिल्यास उमेदवारी लढवणार का ? या ” जर – तर ” च्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी कटाक्षाने टाळले , यावरून भविष्यात ते भाजपाने उमेदवारी दिल्यास नक्कीच उमेदवारी लढवतील , यांत शंकाच नसेल.
शांत असलेले सुरेश भाऊंचा आज हि काहीच अंदाज लागत नसून कर्जत – खालापूर मतदार संघातील नवीन पक्षात – नव्याने चक्रव्यूह रचण्यास पुन्हा एकदा ते तयारीला लागले आहेत . त्यांच्यावर झालेले ” वैचारिक आघात ” , ज्यांना त्यांनी ” राजकीय उर्जा ” दिली त्यांनीच घेतलेला पंगा , जेष्ठबंधु मानुन ज्यांच्या ” आज्ञेचे पालन ” सदैव केले , त्यांनीच फिरवलेली ” पाठ ” या सर्वांतून शेकून व शिकून निघालेले सुरेश भाऊ कुठलाही त्रागा न करता शांत पणाने सर्वाँना सामोरे जात असल्याने भविष्यात नक्कीच राजकीय भूकंप होणार , हे त्रिवार सत्य म्हणावे लागेल.