![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत नगर परिषद हद्दीतील भिसेगाव येथे सालाबाद प्रमाणे यंदाच्या १९ व्यां वर्षी देखील ” श्री ज्ञानेश्वरी पारायण व ज्ञानयज्ञ सोहळा ” ,अखंड हरिनाम सप्ताह सोहळा सेवा संस्था – भिसेगाव यांच्या वतीने ” श्री अंबे भवानी माता मंदिर ” , भिसेगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला . भिसेगाव आणि कर्जत परिसरातील भाविकांनी चार दिवस या भक्तिमय भजन – कीर्तनाचा आनंद घेवून ” श्री हरि ” च्या चरणी तल्लीन झाले.
दिनांक २८ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ या चार दिवस हा ” श्री ज्ञानेश्वरी पारायण व ज्ञानयज्ञ सोहळा ” , मोठ्या उत्साहात संपन्न झाला . नेहमी काकड आरती पहाटे ०५ – ३० वाजताच होत असल्याने भाविकांची गर्दी आरतीस होत होती .
नवनाथ भजन मंडळ – भिसेगाव , हरिओम प्रासादिक भजन मंडळ , भिसेगाव , भैरवनाथ प्रासादिक भजन मंडळ, हालीवली , यांची भजनाने व ज्ञानेश्वरी पारायण , प्रवचने हरिपाठ , किर्तन , भागवत कथासार , दिंडी सोहळा , दिपोत्सव हे सर्व कार्यक्रम भक्ती भावाने मोठ्या उत्साहात साजरे झाले.
ह.भ.प.वासुदेव महाराज बडेकर – किरवली , ह. भ. प. सदानंद महाराज राणे – मोरबे , ह.भ. प. मुक्ताताई संजय पाटील – वारदोली , रायगड भूषण ह.भ.प. रामदास महाराज पाटील – वावोशी , ह.भ.प. पांडुरंग महाराज साळुंखे – सांगली , भागवतकथाकार ह.भ.प. संतोष महाराज पायगुडे पुणे यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर काल्याचा महाप्रसाद , दिंडी सोहळा , दिपोत्सव सोहळा यांत सहभाग घेवून भाविकांनी हरि नामात उपस्थिती दर्शविली तर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा चार दिवस ” श्री ज्ञानेश्वरी पारायण व ज्ञानयज्ञ सोहळा ” , अखंड हरिनाम सप्ताह उत्सव सेवा संस्था, भिसेगाव ग्रामस्थ व महिला मंडळ भिसेगाव यांच्या वतीने संपन्न झाला.