if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा : औंढे येथील 13 जणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविनायक धोंडु शिंदे, निलेश वसंत खाडे(रा. औंढे, लोणावळा ) बापु गेणु खाडे, महादु गेणु खाडे,मधुकर बारकु खाडे, नंदु वारकुं खाडे, अनंता रकमा खाडे, संजय किसन खाडे, शंकर बाबु खाडे,शंकर मारुती खाडे आणि सविंद्रा दत्ता खाडे हे सर्व राहणार औंढे खुर्द, ता. मावळ, जि. पुणे यांच्या विरोधात भाग 5 गु. र. नं. 1044/2020, भा. द. वि. का. कलम 353 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 23/09/2020 दुपारी 12.30 वा. च्या सुमारास मौजे औंढे खुर्द, ता. मावळ, जि. पुणे, येथील गट नं. 101 व जमिन गट नं. 103 ह्या जमिनीवर शासकीय मोजणी सुरु असताना वरील आरोपी यांनी मोजणी दरम्यान ह्या जमिनीवर आमचा ताबा आहे तुम्ही जमीन मोजणी करू नका असे सांगत जमीन मोजणी कामात अडथळा आणला असून त्याबाबत जयदेव भानुदास वाघमारे ( वय 32, रा. मंगल नगर, थेरगाव, पुणे 33) ह्यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.
संदर्भात लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तब्बल तेरा जणांविरुद्ध गुन्हा नोंद करून सदर गुन्ह्याचा अहवाल मा. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी सो वडगाव मावळ यांना रवाना करण्यात आला असून पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार शकील शेख करत आहे.