Monday, July 21, 2025
Homeपुणेलोणावळामावळ लोकसभा संयोजक पदी अमोल भेगडे यांची निवड…

मावळ लोकसभा संयोजक पदी अमोल भेगडे यांची निवड…

कार्ला(प्रतिनिधी):दहिवली येथील अमोल जगत्राथ भेगडे यांची भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा च्या “मावळ लोकसभा संयोजक”पदी निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र राज्य कामगार आघाडीचे अध्यक्ष विजय हरगुडे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्रक देण्यात आले.
यावेळी खडकवासला आमदार भीमराव तापकीर, राज्य सरचिटणीस हनुमंत लांडगे, जिल्हा अध्यक्ष किरण राक्षे, दत्तात्रय निम्हण आदी मान्यवर उपस्थित होते.
निवड झाल्यानंतर बोलताना भेगडे म्हणाले की, माजी मंत्री संजय भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच आगामी काळात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page