Monday, December 23, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा नगरपरिषद उर्दू माध्यमिक विद्यालयाचा पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न…

लोणावळा नगरपरिषद उर्दू माध्यमिक विद्यालयाचा पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न…

लोणावळा : लोणावळा नगरपरिषद उर्दू माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे मंचावर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये सिटीझन फोरमच्या रशिदा शराफ, मीनाक्षी सिन्हा, आयरीन मॅडम,लोणावळा नगरपरिषद शाळा समिती मा. सभापती ब्रिंदा अनिष गणात्रा,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र वर्किंग मेनॉरिटी अध्यक्ष सुलतान मालदार, नेरुळ जामा मस्जिद चे कोषाध्यक्ष बिलाल खान सरगुरू यांसह लोणावळा नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी,मराठी माध्यमिक विद्यालयाचे प्राध्यापक बाळकृष्ण बलकवडे,राष्ट्रवादी काँग्रेस विध्यार्थी शहर अध्यक्ष आदित्य पंचमुख,जाकीर खलिफा, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते फिरोज शेख,मा. नगरसेवक नासिर शेख,आदिल शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रथम विविध स्पर्धा व कला गुणांमधील विध्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.त्यानंतर विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी प्रथम उपस्थितांचे आभार मानत, कामा मुळे वेळ नव्हता त्यामुळे कार्यक्रम उशिरा झाला याची खंत व्यक्त केली. तदनंतर “उर्दू माध्यमातून शिक्षण घेताना आपण जगाच्या कॉम्पिटिशन मध्ये मागे राहू असे विध्यार्थी व पालकांना वाटत असेल तर हा दृष्टिकोन बदला.
कोणत्याही मातृभाषेत उच्च शिक्षण घेतल्याने आपण मोठ्या हुद्द्यावर जाऊ शकतो.उर्दू शाळेत शिकत असताना कोणताही न्यूनगंड न ठेवता फक्त आणि फक्त विध्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे. शिक्षकांच्या सूचनेकडे गांभीर्याने पाहणे, मुलगा अथवा मुलगी असा भेदभाव न करता पालक आणि शिक्षक यांचा समन्वय असणे मुलांच्या करिअरसाठी गरजेचे आहे.तसेच उर्दू शिक्षणातून ही उत्तम काम करायच्या संधी असतात परंतु याकडे आपण लक्ष देणे गरजेचे आहे असे बोलून विध्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी विध्यार्थ्यांनी विविध नृत्य व नाट्य प्रात्यक्षीके करून उपस्थित मान्यवरांना आकर्षित करत कार्यक्रमाचा समारोप झाला.
- Advertisment -

You cannot copy content of this page